Homeताज्या घडामोडीसोशल मिडिया वर आक्षेपार्ह पोस्ट करुन मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा...

सोशल मिडिया वर आक्षेपार्ह पोस्ट करुन मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल.

सजग नागरिक टाइम्स : सध्या काही रिकामटेकड्या लोकांकडून दोन समाजात तेड निर्माण करण्याचे प्रयत्न जोरदार चालू असून त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न दोन्ही समाजातील तरुण करताना दिसत आहे.

या टवाळखोरांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणाला म्हणतात हेच माहीत नसल्याने कोणाचाही अपमान करण्यास मुभा आहे असे गैरसमज करून जगत असतात.

video 🖕

ज्यांच्या बापाने किंवा त्यांनी कधी समाजासाठी काहीही केले नसतील असे लोक देशासाठी बलिदान देणाऱ्या थोर लोकांचे अपमान करण्यास मोठेपणा समजत असतात.

परंतु अश्या रिकामटेकड्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी दोन्ही समाजात तरुण सक्रिय झाले आहे हे त्या रिकामटेकड्यांनी विसरून चालता कामा नये.

असाच एक प्रकार परभणी शहरांमध्ये एका दीड शहाण्याने केला होता त्याला त्याची जागा पोलिसांनी दाखवली असून फैसल शेख या तरुणाच्या फिर्यादीवरून सोशल मीडियावर थोर पुरुषांचे अपमान जनक फोटो अपलोड करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी लवेश जाधव या आरोपीवर 295अ,153अ प्रमाने परभणी मध्ये नवामोंढा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणांनी रिकामटेकड्या समाजकंटकांच्या फसव्या बतावणी पुढे शरण जाऊन आपले व आपल्या परिवाराचे आयुष्य बरबाद करू नये असे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आव्हान केले आहे.

डिलिव्हरी बॉयच ग्राहक व ऑनलाईन सेलरला घालत आहे गंडा.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular