ताज्या घडामोडी

फॉर्म भरा अन् रेशन दुकान नावावर!

Advertisement

Sajag nagrikk times : पुणे: अन्नधान्य वितरण कार्यालय, पुणे शहराअंतर्गत पुणे व पिंपरी – चिंचवडमधील परिमंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात २५ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्यास १ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

पुण्यातून तीन वर्षांत २ हजार ६०९ मुली-महिला बेपत्ता

Advertisement

परिमंडळ अधिकारी ब, क, फ, ग, ह, ल, म यांच्या कार्यक्षेत्रातील २५ ठिकाणी या रास्त भाव दुकानाचा परवाना मंजुरीचा जाहीरनामा १ जुलै रोजी प्रसिद्ध केला आहे. इच्छुक व पात्र संस्थांनी १ सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत. मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे अन्नधान्य वितरण अधिकारी सीमा होळकर म्हणाल्या.

कोंढव्यात दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराविरोधात एमपीडीए ची कारवाई

Share Now