Homeताज्या घडामोडीखासदार गिरीश बापट यांचे दुःखद निधन !

खासदार गिरीश बापट यांचे दुःखद निधन !

सजग नागरिक टाइम्स: पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते.

गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट हे आजारी होते. मात्र, कालपासून त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. बुधवार दि. २९मार्च रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, गिरीश बापटांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी असेल.

त्यानंतर सायंकाळी ७ वाजता वैकुंठस्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतिल.

गिरीश बापट हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असून गेली अनेक वर्षे पुण्यातील राजकारणात ते सक्रिय होते. मात्र,गेल्या काही वर्षांपासून गिरीश बापट यांना दुर्धर आजाराची लागण झाल्यामुळे ते राजकारणापासून दूर होते.

नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांनी आजारपण बाजुला सारून कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular