ताज्या घडामोडीपुणे

आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी:राष्ट्रवादी

Advertisement

आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी”(Chmpa Saree)

Chmpa Saree:आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथे साड्या वाटल्याचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात आला.

chmpa-saree-news-ncp-aandolan

सजग नागरिक टाइम्स : पुणे (दि. ३०) आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी” (Chmpa Saree)

असे म्हणत राष्ट्रवादीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथे साड्या वाटल्याचा निषेध करण्यात आला.

डेक्कन येथील खंडाेजीबाबा चाैक येथे राष्ट्रवादीकडून भाजपा विरोधात आंदाेलन करण्यात आले.

यावेळी भाजपा व आमदार चंद्रकांत पाटलांच्या निषेधार्थ
घाेषणा देण्यात आल्या.

हेपण वाचा:आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल अशा आशयाचे बारामतीमध्ये झळकले पोस्टर्स

चंद्रकांत पाटील यांनी काेथरुड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांच्या माध्यमातून काेथरुड भागातील

घरकाम करणाऱ्या महिलांना दिवाळीच्या निमित्ताने साड्यांचे वाटप केले.

या साडी वाटपाबाबत अनेकांनी आक्षेप घेतले.मनसेकडूनही याचा निषेध व्यक्त करण्यात आला हाेता.

काल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून डेक्कन येथील खंडाेजीबाबा चाैकात निषेध आंदाेलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित हाेते.

Advertisement

रिजेक्ट झालेल्या साड्या वाटल्याचा आराेपही यावेळी करण्यात आले.

व्हिडिओ गेम व लॉटरी सेंटरवर पोलिसांचा छापा

इतर बातमी : आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल अशा आशयाचे बारामतीमध्ये झळकले पोस्टर्स.

Baramati News :सजग नागरिक टाइम्स: बारामती (दि. २९) – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुंकीचे निकाल लागले आहेत.

बारामतीमधील निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी त्यांच्या विरोधात उभे राहिलेले

भाजपाचे गोपीनाथ पडळकर यांचा तब्बस १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.

या विजयानंतर बारामतीत पोस्टरबाजीला उधाण आले आहे.

‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल,’ अशा आशयाचे पोस्टर्स बारामतीमध्ये झळकू लागले आहे.

हेपण वाचा: दिवाळी व पाडव्याच्या मुहूर्तावर भैरवनाथ”मंदिर येथे दिप प्रज्वलित करून मिठाई वाटप

मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ संबोधलेल्या भाजपच्या गोपीनाथ पडळकरांसह सर्वच उमेदवारांचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे.

तसेच अजित पवारांसमोरील सर्वच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले होते.

अजित पवारांच्या गोविंदबाग या निवासस्थानाजवळ त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आले.

त्याबॅनर्सवरील मजकूर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल’ असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे.

त्यामुळे बारामतीसह सर्वत्र या पोस्टर्सचीच चर्चा आहे.

Share Now