Zopadpatti Suraksha Dal:झोपडपट्टी वासियांच्या प्रश्नांसाठी आपण आमदार या नात्याने नेहमीच सहकार्य करू
सजग नागरिक टाइम्स : Zopadpatti Suraksha Dal :नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका झाल्या .
यामध्ये पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघात मोठया मताधिक्याने निवडून आल्याबद्दल
नवनिर्वाचित आमदार संजय जगताप यांचा झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्याहस्ते महात्मा फुले पगडी ,
उपरणे व शाल देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पुणे शहर अध्यक्ष मोहम्मद शेख ,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विजय कोलते , सुदाम इंगळे , नगरसेवक गणेश ढोरे , अर्चना कामठे , प्रविण कामठे , संजय हरपळे ,
संतोष पवार , रमेश नवगुळे , रोहित राऊत , सुनील साळवे , नंदू हरपळे , सतीश कांबळे , मछिंद्र कामठे , सतीश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते .
दिवाळी व पाडव्याच्या मुहूर्तावर भैरवनाथ”मंदिर येथे दिप प्रज्वलित करून मिठाई वाटप
यावेळी नवनिर्वाचित आमदार संजय जगताप यांनी आपल्या सत्कारपर भाषणात सांगितले कि ,
पुरंदर ग्रामस्थांच्या अडी अडचणी समजावून घेऊन कोणी गटा तटाचे राजकारण न करता हरपळे ,
कामठे या ग्रामस्थांनी संघ ताकदीने गावाचा विकास करून घ्यावा , त्या विकासात चार पाऊलेनी आपण पुढे राहू ,
झोपडपट्टी वासियांच्या प्रश्नांसाठी आपण आमदार या नात्याने नेहमीच सहकार्य करू .झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांनी सांगितले कि ,
हवेली पुरंदर तालुक्यातील शासकीय जमिनीवर वसलेल्या झोपडपट्टी धारकांना पक्की घरे देऊन सातबारावर नोंद करावी असे आवाहन भगवान वैराट यांनी केले.
आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी:राष्ट्रवादी
इतर बातमी : आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल अशा आशयाचे बारामतीमध्ये झळकले पोस्टर्स.
सजग नागरिक टाइम्स: बारामती (दि. २९) – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुंकीचे निकाल लागले आहेत.
बारामतीमधील निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी त्यांच्या विरोधात उभे राहिलेले
भाजपाचे गोपीनाथ पडळकर यांचा तब्बस १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.
या विजयानंतर बारामतीत पोस्टरबाजीला उधाण आले आहे.
‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल,’ अशा आशयाचे पोस्टर्स बारामतीमध्ये झळकू लागले आहे.
मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ संबोधलेल्या भाजपच्या गोपीनाथ पडळकरांसह सर्वच उमेदवारांचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे.
तसेच अजित पवारांसमोरील सर्वच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले होते.