ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

पुण्यात पकडलेला तरुण पाकिस्तानी?

Advertisement

पुणे :खोटी कागदपत्रे बनवून पुण्यात वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला खडक पोलिसांनी अटक केली आहे.राहण्यामागचे कारण भलतेच निघाले, आई वडिलांच्या कौटुंबिक भांडणात आजीकडे येऊन राहिलेल्या तरुणाची फरफट झाल्याचे दिसून येत आहे.

महम्मद अमान अन्सारी (वय २२, रा. भवानी पेठ) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत पाकिस्तानी नागरिक पडताळणी विभागाचे पोलीस अंमलदार केदार जाधव यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डी राजा यांनी माहिती दिली.

महम्मद अन्सारी याची आई ही भारतीय आहे. तिचा पाकिस्तानी नागरिक असलेल्या अमान यांच्याशी निकाह झाला होता.

लग्नानंतर त्या पाकिस्तानला राहण्यास गेल्या होत्या. त्यांचा युएईला वास्तव्य करण्याचा विचार होता. दरम्यान, त्यांना एक मुलगा झाला. त्यानंतर त्यांच्यात कौटुंबिक वाद निर्माण झाला. त्याची आई सध्या युएईमध्ये वास्तव्याला आहे. महम्मद हा जन्माने पाकिस्तानी आहे.

Advertisement

युएईला राहणार्‍या आईने त्याच्या शिक्षणासाठी २०१५ मध्ये महम्मद याला पुण्याला आपल्या आई व भावाकडे पाठविले.

अल्पवयीन असताना तो पुण्यात आला. पुण्यात तो शिक्षण घेत असताना त्याने आपला पाकिस्तानी जन्म असल्याचे लपवून ठेवून येथील खोटी कागदपत्रे सादर करुन भारतीय पासपोर्ट बनविला.

त्याचा वापर करुन त्याने पुणे व दुबई विमान प्रवास करुन तो आपल्या आईलाही भेटायला गेला होता अशी माहिती मिळाली.

दरम्यान, विशेष शाखेच्या परदेशी नागरिक पडताळणी विभागातील पोलीस परदेशी नागरिकांचा शोध घेत असताना त्यांना महम्मद अन्सारी याची माहिती मिळाली.

त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने बेकायदेशीरपणे वास्तव करीत असून त्याने बनावट कागदपत्राद्वारे पासपोर्ट बनविला असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

त्याचे आई,वडिल सध्या काय करतात़ तो दुबईला कशासाठी गेला होता़ इतरांशी त्यांचे काही संबंध आहे का? तसेच अन्य माहिती घेत असल्याचे पोलीसांनी सांगितले.

Share Now