c a foundation result : सी ए फाउंडेशन परिक्षेत रम्या मुद्दलाने अखिल भारतीय स्तरावर ( AIR) २० वे स्थान मिळवून गाठले यशाचे शिखर
c a foundation result : पुणे : इन्स्टियुट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियातर्फे नोव्हेबर २०१९ मध्ये घेण्यात आलेली सी ए फाउंडेशन परिक्षेत
आकाश आगरवाल क्लासेसच्या रम्या मुद्दलाने अखिल भारतीय स्तरावर ( AIR) २० वे स्थान मिळवून यशाचे शिखर गाठले .
रम्याने मार्च २०१९ (ca foundation exam 2019 ) मध्ये झालेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेत देखील ९३ टक्के गुण मिळवून उत्कृष्ट प्रदर्शन केले होते .
रम्याने या दोन्ही यशाचं श्रेय आकाश आगरवाल क्लासेसला दिले .
इतर बातमी : डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बहु भाषिक कवितांचे बहारदार सादरीकरण
कारण तिच्या मते आकाश आगरवाल क्लासेसमध्ये पाया मजबूत झाल्यामुळे ती या दोन्ही परीक्षेत यशस्वी ठरली.
यंदा सी ए फाऊंडेशन नोव्हेबर २०१९ ला आकाश आगरवाल क्लासेसतर्फे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले .
ICAI च्या ( ca foundation exam 2019 ) सी ए फाऊंडेशन नोव्हेंबर २०१९ मध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले .
विश्रांतवाडीमध्ये स्थित असलेल्या या क्लासचे संचालक सी ए आकाश आगरवाल व करण आगरवाल असल्याची माहिती मिळाली .
video news : फसवणूकीचे व इतर गंभीर गुन्हे दाखल होऊन ही आरोपी मोकाट
इतर बातमी : डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बहु भाषिक कवितांचे बहारदार सादरीकरण
सजग नागरिक टाइम्स : पुणे : डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी
रविवार २ फेब्रुवारी रोजी पं. नेहरू सभागृह ( घोले रस्ता ) येथे झालेल्या ‘धनक ‘या बहुभाषिक कवितांच्या कार्यक्रमाला रविवारी दुपारी चांगला प्रतिसाद मिळाला.
‘भाषा वेगळ्या असल्या तरी त्यातून प्रकटणारे प्रेम एकच आहे’असा संदेश देत ‘धनक‘
हा युवा कवींचा कविताविषयक कार्यक्रम रविवारी दुपारी पुण्याच्या बहुभाषक तरुणाईने डोक्यावर घेतला.
हिंदी, गुजराती, मराठी, ऊर्दू कवितांची जणू बरसातच या कार्यक्रमात झाली.
फेब्रुवारी महिना सुरू होताना झालेल्या या कार्यक्रमात प्रामुख्याने प्रेम, विरह विषयक कवितांची बरसात झाली.
‘दखनी अदब फाऊंडेशन ‘ तर्फे या तीन दिवसीय फेस्टीव्हल चे आयोजन करण्यात आले.
या कविता विषयक कार्यक्रमात शिखा पाचौली, विरल देसाई, कमल कर्मा, संदीप द्विवेदी, संतोष सिंग, प्रमोद खराडे सहभागी झाले. आरजे तरुण यांनी सूत्र संचालन केले. अधिक वाचा