Sajag Nagrik Times|
महाराष्ट्राचे अराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज या़ंच्या जयंती निमित्त भवानी पेठेतील तुळजाभवानी मंदिरात भवानीमातेचे दर्शन आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पुण्य नगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, काँग्रेस पक्ष गट नेते आबा बागूल,महापालिका आयुक्त विक्रम कुमार ,
अति.महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, झोन उपायुक्त अविनाश सपकाळ , महा.सहा.आयुक्त गणेश सोनूने आणि इतर मान्यवर व अधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
भवानीमाता मंदिरात आले असता महा.सहा.आयुक्त आणि इंजि.सिमरन पिरजादे व सर्व महिला सेविकांनी स्वतः भगवे फेटे बांधून मान्यवरांचे स्वागत केले.या कार्यक्रमाचे नियोजन अभियंता संघाच्या महिला प्रतिनिधी इंजि.सिमरन पिरजादे आणि त्यांच्या कार्यालयातील महिला स्टाफने केले असल्याची माहिती मिळाली.