Sub teachers suspended : पुणे महानगरपालिकेच्या सर्वेक्षण कामाला दांडी मारणे उपशिक्षकांना पडले भारी 12 जणांना घरचा आहेर..
Sub teachers suspended : सजग नागरिक टाईम्स : कोरोना सर्वेक्षणाच्या कामाला पुणे महानगरपालिकेतील व शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.
नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी उपशिक्षकांना चांगलेच भोवले आहे. महानगरपालिकेच्या १२ उप शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.
या उपशिक्षकांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली असून याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत.
पालिकेने शहरात सर्वेक्षण करण्याकरिता जवळपास एक हजार पथके तयार केली आहेत. या पथकांमध्ये शिक्षक-उपशिक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे.
पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे क्षेत्रीय स्तरावर सर्वेक्षणासाठी सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे समन्वयाचे काम देण्यात आले आहे.
पुण्यातील हजारो कुटुंबांचे होणारस्थलांतर (Quarantine)
उपशिक्षकांनी त्यांच्याकडे हजर होणे आवश्यक आहे. परंतु, पालिकेच्या उपशिक्षकांनी कामाला गैरहजेरी लावली.
या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. परंतु त्यांनी कोणताही खुलासा केला नाही.
हे उपशिक्षक कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता अथवा कोणतीही वैद्यकीय रजा व अर्जित रजेची मान्यता न घेता परगावी गेल्याचे निदर्शनास आले आहे.
सर्वेक्षणाच्या कामावर गैरहजर राहिलेल्या ४५ उपशिक्षकांना सर्वेक्षण कामासाठी २४ तासांच्या आत हजर होण्याची नोटीस बजावण्यात आले होते ,
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ (२) (क) नुसार निलंबित करण्यात येईल अशी कारणे दाखवा नोटीस मिळताच ३२ शिक्षक कामावर हजर होते.
बाकिच्या १२ उपशिक्षकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
या उपशिक्षकांची खातेनिहाय चौकशी लावण्यात आली असून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
निलंबित उपशिक्षकांची नावे खालीलप्रमाणे स्वरदा प्रवीण चव्हाण, निलेश श्रीरंग मोरे, विजया लालासाहेब वाघ, मोहिनी चंद्रकांत मेमाणे,
किसन चींधू कवटे, माधनी किशोर घाडगे, केशव गुलाब राव वाघमारे, सुजाता संपत राऊत, राजेंद्र महादेव दिवटे,
राहूल जाधव , शिरीन इसाक मुजावर, चंद्रसिंग अमरसिंग पवार, अशी निलंबित केलेल्यांची नावे आहे.
Hadapsar | Lockdown च्या काळात Smile Foundation तर्फे गरजुंना रेशनकिट ची मदत
[…] कामाला दांडी मारणे उपशिक्षकांना पडले… […]