रस्त्यावरील लोखंडी ड्रेनेजमधे मुलाचा पाय अडकला; अग्निशमन दलाकडून सुटका

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रस्त्यावरील लोखंडी ड्रेनेजमधे मुलाचा पाय अडकला

सजग नागरिक टाइम्सःपुणे -स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वडिलां सोबत एक विद्यार्थि शाळेतून स्वातंत्र्य दिन साजरा करुन येत असताना नवी पेठेतील हिरो होंडा शोरुम जवळ सकाळी साडेआठ वाजता या अकरा वर्षाच्या मुलाचा पाय तिथे असलेल्या ड्रेनेजच्या वरील लोखंडी झाकणाच्या आत अडकल्याची घटना घडली. तातडीने याबाबत नागरिकांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून मदतीची मागणी केली.

हे पण पहा : राष्ट्रीय सुरक्षा साक्षरता साक्षरता अभियान अंतर्गत  स्प्लेश एन डॅश कार्यक्रम

The child's foot stuck in the iron rods on the road; Rescue from the Fire Brigade.sajag nagrikk times .sanata अग्निशमन दलाचे जवान तिथे जाताच एक लहान मुलाचा पाय गुडघ्यापासून खाली ड्रेनेजच्या त्या लोखंडी झाकणात पुर्णपणे अडकलेला असल्याचे दिसले. जवानांनी लगेचच स्प्रेडरचा वापर करुन व मुलाला धीर देऊन लोखंडी झाकणाचे छोटे गज एकमेकांपासून दूर करुन अलगद मुलाचा पाय सुखरुप बाहेर काढला.

सजग च्या व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा 

Advertisement

मुलाच्या पायाला सुदैवाने मोठी कुठलीही दुखापत झाली नसली तरी चालताना रस्त्यावरील ड्रेनेजकडे लक्ष देऊनच चालले पाहिजे असे मत तेथील नागरिकांनी व्यक्त केले. सदर मुलगा प्रशांत संतोष येवले, वय वर्षे ११ असे त्याच्या वडिलांकडून समजले.मुलाचा पाय पाचच मिनिटात बाहेर काढल्यानंतर वडिलांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे भावुक होत विषेश आभार मानले. तर मुलाने जवानांना हातातील ध्वज उंचावून “जयहिंद” म्हणत सलाम केला.या बचाव पथकात एरंडवणे अग्निशमन केंद्राचे अग्निशमन अधिकारी राजेश जगताप, वाहन चालक ज्ञानेश्वर खेडेकर, जवान किशोर बने, प्रविण रणदिवे, संजय पाटील तसेच क्विक रिस्पॉन्स टिमचे जवान संतोष कार्ले, हेमंत कांबळे, शुभम गोल्हार, राकेश नाईकनवरे यांनी सहभाग घेतला.

हे पण पहा :  पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला 

 

Advertisement

Leave a Reply