पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला

जुना संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात,

सजग नागरिक टाइम्स :पुणे – शिवाजीनगर येथे कामगार पुतळ्याजवळील जुना संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली आहे. पहाटे साडेचार वाजता हा अपघात झाला असून यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. ट्रकमध्ये अजून काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे़.

व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा 

DIGITAL-BUSINESS-CARD-MK-DIGITAL-SEVAmk-digital-seva

latest news on Shivaji nagar bridge sajag nagrikk times sanataकामगार पुतळ्याकडून जुन्या बाजारकडे भरधाव वेगाने जात असताना ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रेल्वे पूल व जुना संगम पूल यांच्या मधल्या भागातील पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळला.

सजग च्या व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा 

या अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. शिड्या लावून जवान नदीपात्रात उतरले़ असता ट्रक उलटा कोसळल्याचं दिसले. क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

हे पण पहा : तीन कोटी रुपयांच्या जुन्या नोटासहित नगरसेवक अटकेत