आज पुण्यात मातंग संघर्ष महामोर्चा काढण्यात आला. 

सजग नागरिक टाइम्स :पुणे : मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारांच्या विरोधात आज (ता.21) पुण्यात  मातंग संघर्ष महामोर्चा काढण्यात आला. जळगाव जिल्ह्यात दोन किशोरवयीन मुले विहरीत पोहले म्हणुन अमानुष मारहाण करण्यात आली,

विडिओ  पाहण्यासाठी क्लिक करा .

Organizing Matang Sangharsh Maha Morcha in Pune sajag nagrikk times sanata

हे पण पहा : पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला

लातूर जिल्ह्यात नवरदेवाने मारुतीमंदिरामध्ये प्रवेश केला त्यामुळे महिलांसह वऱ्हाडाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली , भिमाकोरेगांव दंगलीची मुख्य साक्षीदार व फिर्यादी असलेली पुजा सकट या तरुणीचा खुन करण्यात आला..अशा काही घटनां गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत.

सजग च्या  विडिओ  बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा 

मातंग समाजावर होणाऱ्या अन्यायाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि न्याय मिळण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.पुण्यातील सारसबागेपासून या मोर्चाला सूरूवात झाली, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथे हा मोर्चाचे समारोप झाला. मोर्चाची सुरवात संविधान उद्देशिका वाचनाने  झाली. मोठ्या संख्येने मातंग समाजातील बंधू बघीनी न्यायासाठी या महामोर्चात सहभागी झाले. यावेळी महिला मोर्चाच्या अग्रस्थानी होत्या.

अमाझोन,फ्लिपकार्ट,गियरबेस्टचे लेटेस्ट आँफर एकाच ठिकाणी http://www.sanatnew.com/  

Leave a Reply