ब्रेकिंग न्यूज

१७ घरगुती गॅसचे सिलेंडर जप्त : व्यवसायासाठी चालू होते वापर

Advertisement

सजग नागरिक टाइम्स- पुणे शहरात अनेक ठिकाणी चहाच्या टपरीवर,हातगाडयांवर, हाॅटेल मध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर सरासर पणे होत असताना देखील गॅस कंपनीचे सरासर दुर्लक्ष होताना दिसते आणि खापर फोडले जाते ते अन्न धान्य वितरण कार्यालयावर, परंतु अन्न धान्य वितरण कार्यालयातील “ग” परिमंडळ विभागाने एक जोरदार कारवाई केली आहे पुणे शहरातील गजबजलेले ठिकाण सारसबाग, टिळक रोड, सदाशिव पेठ, हत्ती गणपती चौक,नवी पेठ, या भागात घरगुती गॅस सिलिंडर व्यवसायिक कारणांसाठी वापरले जात असल्याचे समजल्यावर अन्न धान्य ग” परिमंडळ विभागाने अचानकपणे धाडी टाकून घरगुती गॅसचा वापर करणारे व्यावसायिकांची धांदल उडवली. कारवाईत एकुण 17 घरगुती गॅस सिलिंडर ताब्यात घेण्यात आले आहे या पैकी 14 गॅस सिलिंडर हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनीचे व 3 भारत पेट्रोलियम कंपनीचे जप्त करण्यात आले आहे .या तपासणी मध्ये सिंहगड स्नॅकस सेंटर, सारस अमूल पावभाजी, सिद्धिविनायक पावभाजी, शिवांजली पावभाजी, संजय भेळ, रसरंग, चौहान पाणीपुरी भेळपुरी, चितळे स्वीट होम, शहाजी शिवदे पावभाजी, स्वप्निल जाधव काॅफी शाॅप, अश्या व्यवसायिकांकडून गॅस ताब्यात घेण्यात आले आहे,या अचानकपणे केलेल्या कारवाई मुळे व्यवसायिकांचे नक्कीच धाबे दणाणले गेले आहे . पुणे जिल्हाअधिकारी यांच्या सुचना मिळताच सुचना नुसार विलंब न लावता अन्न धान्य ग” परिमंडळ अधिकारी माणिकराजे निंबाळकर यांनी कारवाईचे सत्र सुरू केले या कारवाईत पुरवठा निरीक्षक स्मिता जोशी, दिपाली गोठेकर, निखील खाणविलकर, लता सणस,व इतर कर्मचारी उपस्थित होते विषेश म्हणजे मोठी कारवाई करताना कर्मचारी यांचा फौजफाटा असणे गरजेचे आहे परंतु ग” परिमंडळ अधिकारी माणिकराजे निंबाळकर यांनी चारच कर्मचारी घेऊन मोठी कारवाई करून एक आदर्श निर्माण केला आहे.

Share Now

Leave a Reply