सजग नागरिक टाइम्स: मुंबई : बॉलीवूड चे स्टार व अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपट सृष्टीवर ठसा उमटवणारे प्रसिद्ध व ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे आज मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते.शशी कपूर यांच्या पश्चात संजना कपूर,कुणाल कपूर,करण कपूर असा परिवार आहे.शशी कपूर यांनी १९४० मध्ये बालकलाकार म्हणून चित्रपट श्रुष्टीत पदार्पण केले होते .त्यांनी ११६ सिनेमांमध्ये काम केले असून त्यापैकी ६१ चित्रपट मध्ये त्यांनी मुख्य भूमिका केली होती.