पुणे: घोरपडे पेठ येथील नामचीन गुंड अब्दुल गनी खान टोळीस मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आदेश दिले . गुंड अब्दुल गनी खान टोळीचे घोरपडे पेठ भागात दिवसेंदिवस दहशत माजवण्याचे प्रकार जोरास चालू होते अनेक जणांना धमकावून खंडणी मागणे ,मारहाण करणे ,दहशत माजवणे असे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. नजमा इसाक शेख रा.घोरपडे पेठ यांच्या चायनीज पदार्थांच्या दुकानावर येऊन अब्दुल गनी खान,२)अक्षय राजेश नाईक दोघे रा.घोरपडे पेठ ३)अक्रम नासीर पठाण रा.औंध हे धमकी देऊन दर महिना २००० रु हप्ता मागत होते न दिल्यास चायनीज पदार्थांमध्ये विष कालवण्याची धमकी दिली असल्याने शेख यांनी खडक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली होती.तसेच महेबूब हुसेन अल्लाना,इम्रान अफजल शेख ,लता ताटे अशा अनेक जणांनी यांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती त्या अनुषंगाने खडक पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शन नुसार गुन्हेचे पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के यांनी अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग पुणे शहर याना कलम २३(१) प्रमाणे प्रस्ताव सादर केला होता.सदरील प्रस्तावाला अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग पुणे शहरचे रविंद्र सेनगावकर यांनी मंजुरी दिली व सदरील गुन्ह्याचा तपास बाजीराव मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त शहर विभाग यांच्याकडे देण्यात आला होता.डॉ बसवराज तेली पोलीस उप आयुक्त यांच्या मार्गदर्शन खाली परिमंडळ १ पुणे शहर बाजीराव मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त शहर विभाग यांनी खडक पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी ,गुन्हेचे पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के,पोलीस उप निरीक्षक अनंता व्यवहारे , पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड,सतीश नागूल व इतर कर्मचारीने मिळून तपास पूर्ण करून सदर गुन्ह्याच्या आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करणे कामी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना अहवाल सादर केला असता त्यांनी बारकाईने अवलोकन करून वरील गुन्हेगाराविरुद्ध मोक्का अंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळाली.
गुंड अब्दुल गनी खान टोळीस मोक्का
RELATED ARTICLES