Banjara community:बंजारा समाजातील पीडित कुटुंबियांना न्याय मिळून देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
अठरा वर्षीय युवक नामे विनोद शंकर पवार यांची तळेगांव दाभाडे-पुणे येथे अज्ञात राक्षसानी निर्घृण हत्या करुन लोहगड घाट-लोणावळा येथे फेकून दिले.सदर घटनेला जवळपास तीन महीने संपत आले तरी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे अधिकारींनी अजुन पर्यंत आरोपीला अटक केली नाही.
हिंदी न्युज पड़ने के लिए यहाँ पर क्लिक करे
अमानवीय क्रूर हत्या करण्यात आली असताना देखील पोलिसी चिड़ीचुप आहे,खरच पोलिसांकडे आरोपीला पकडण्या इतके यंत्रणा नसतील का ?अथवा पोलिस आरोपीवरच मेहरबानी करत नसतील ना..? सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे.
एकुलता एक मुलगा हरवून बसलेल्या माता पित्याची आत्मा काय म्हणत असावे याच विचार न केलेलच बर..पण संबंधित पोलिस अधिकारी यांच्याकडे जवळपास सगळे पुरावे असताना देखील टाळाटाळ करीत असल्याचे (banjara community) बंजारा समाजाचे म्हणणे आहे .
त्यामुळे बंजारा समाजातील पीडित कुटुंबियांना न्याय मिळून देण्यासाठी तसेच सबंधित अधिकाऱ्यांच्या जाहिर निषेध नोंदविण्यासाठी बंजारा समाजाचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला .
या लिंक वर क्लिक करून फेसबुक पेजला लाईक करूनही बातम्या मिळवू शकता
सदर मोर्चामध्ये आमदार हरीभाऊ राठोड ,ऍड. रमेश खेमू राठोड,संतोष पवार,युवराज आडे,दिनेश राठोड,हृषिकेष चव्हाण,कमलताई आडे,जयश्री राठोड,संजय चव्हाण,विजय आड़े,संजय जाधव,सचिन जाधव,तारकेश्वरी राठोड,शरद पवार,बाबू पवार,ऍड.सोनाली घाडगे,सचिन जाधव,मूर्ति राठोड,रत्नंजय राठोड,राजाभाऊ चव्हाण पीडित मुलाचे आई वडील व असंख्य बंजारा उपस्थित होते. सदर मोर्चाचे आयोजन बंजारा समाजाचे नेते ऍड रमेश खेमू राठोड यांनी केले होते.
नववी मध्ये शिकणाऱ्या १३ वर्षीय चिमुरडिचा लैंगिक छळ करुन सतत त्रास देणाऱ्या नराधम विरोधात आई वडिलांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती,परंतु संबंधित पोलिस स्टेशन अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची गंभीर पणे दखल घेतली नाही.
शेवटी त्या नाराधमांच्या लैंगिक त्रासाला कंटाळून चिमुरडीने विष प्राशन करुन आपला जीवन संपविला.अशा नराधमांना शिक्षा तर झालीच पाहिजे परंतु निष्काळजी पणे राहिलेल्या त्या संबंधित अधिकारी यांच्यावर देखील कड़क कारवाई झाली पाहिजे. एकीकडे खुलेआम खून करुन राक्षरूपी मारेकरी फिरत आहे तर दुसरीकडे चिमुरडीचा जिव घेणारे हैवानरूपी नराधम बिंदास्तपणे वावरत आहे.
अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करून खरेदी करू शकता .
सदर दोन्ही घटनेसंदर्भात दिनांक ४ फेब्रुवारी,वार-सोमवार रोजी ११ वाजता क्रूर हत्या करणाऱ्या व लैंगिक छळ करुन चिमुरडीचा जिव घेणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावे व पीडित कुटुंबियांना न्याय मिळून देण्यासाठी तसेच सबंधित अधिकाऱ्यांच्या जाहिर निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय-पुणे येथे मोर्चा काढण्यात आला त्या वेळी ऍड रमेश राठोड व बंजारा शिष्ठमंडळानी जिल्हाधिकारी साहेबांना भेटुन सविस्तर निवेदन देण्यात आले.