सजग नागरिक टाइम्स:पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट व सभाग्रह नेता श्रीनाथ भिमाले यांनी एका cng पंपावर cng वर चालणार्ऱ्या दुचाकी प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. एम एन जी एल ने पुणे शहरात पाच हजार दुचाकींना cng बसविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे .याच प्रकल्पाचे उद्घाटन २४ नोव्हेंबर रोजी पुण्यात झाले यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट,पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान , सभाग्रह नेता श्रीनाथ भिमाले,खासदार अनिल शिरोळे ,हे उपस्थित होते असे दैनिक वृत्त पत्रात फोटो छापून आले यावेळी cng वर चालणारी दुचाकी वर बसून पालक मंत्री गिरीष बापट,व सभाग्रह नेता श्रीनाथ भिमाले यांनी डोक्यावर हेल्मेट न घालता दुचाकी चालवून मोटर व्हेईकल अॅकट चे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कोणत्याही पोलिसाने कारवाई केली नाही .त्यांचे पाहून इतर लोक कायद्याचा उल्लंघन करतील व इतरांना वाव मिळेल म्हणून पुण्यातील वकील अॅड.वाजीद खान बिडकर यांनी पुणे पोलीस आयुक्त यांच्या कडे लेखी तक्रार करून बापट व भिमाले यांच्या कडून दंड वसूल करण्याची मागणी केली आहे.
पालकमंत्री गिरीष बापट व सभाग्रह नेता श्रीनाथ भिमाले विरोधात पुणे पोलिसात तक्रार दाखल
RELATED ARTICLES