झाडे न तोडता रेल्वे स्टेशन बनविण्याची मागणी

सजग नागरिक टाइम्स  :पुणे शहरातील शिवाजीनगर हा भाग सतत वर्दळीने भरलेला असतो व त्यामुळे याठिकाणी वायू प्रदूषणहि भरपूर असते ,याच शिवाजीनगर परिसरात अनेक शासकीय व खाजगी कार्यालय,शाळा,न्यायालय आहेत येथे शहर व गावातून नागरिकांचे दररोज येणे चालू असून वाहतुकीचे प्रमाणही जास्त आहे.या वायूचे प्रदूषण कमी करण्याचे काम हि झाडे करत असल्याने तेच जर तोडण्यात आले तर प्रदुषणात वाढ होऊन याचे दूष परिणाम वाढतील दूष परिणाम वाढू नये व शासकीय गोदामातील झाडे न तोडता रेल्वे स्टेशन बनवावे  म्हणून राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे पर्यावरण प्रेमी युवा उपाध्यक्ष शेरआली शेख यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांन सोबत वृक्ष प्राधिकरण समितीला मागणीचे पत्र दिले असल्याचे सांगितले. 

 

Leave a Reply