पुण्याच्या माजी महापौर चंचलाताई कोद्रे यांचे निधन

सजग नागरिक टाइम्स:पुणे शहराचे माजी महापौर चंचलाताईकोद्रे यांचे आज निधन झाले चंचलाताई कोद्रे यांच्या सारख्या तरूण आणि उमद्या व्यक्तिमत्वाचे अकाली निघून जाणे हे पुण्यातील नागरिकांसाठी धक्कादायक आहे.नगरसेविका असताना अनेक वेळा चंचलाताईने  परिसरातील समस्यांसाठी सभागृह दणाणून सोडले होते.ते पुण्याचे महापौर असतानाही पुण्याच्या समस्य्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत होते.पुण्याच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी कधीही दुजाभाव केले नाही महापौर पद त्यांनी इमानेइतबारे पूर्ण पणे निभावले असून अश्या तडफदार व्ययक्तीमत्वाचे आज पुण्यात निधन झाल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या मुंढवा येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघणार असून मुंढवा स्मशान भूमीत अत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply