रेशनिंग कार्यालयाची जोरदार कारवाई: ४५ घरगुती गॅस सिलेंडर जप्त

सजग नागरिक टाइम्स:पिंपरी चिंचवड : शहरातील नागरिकांना घरगुती गॅस वेळेवर मिळणे कठीण असते पण व्यावसायिक कारणांसाठी हेच घरगुती गॅस वेळेवर व्यवसायिकांना मिळत असल्याने या गॅसचे वापर घरगुती ग्राहकांपेक्षा व्यावसायिकच जास्त वापर करत असल्याने कमी खर्चात जास्त कमाई देणाऱ्या या सिलेंडरची मागणीही व्यावसायिकांमध्ये जास्त असून या गॅसचा वापरही धडाक्याने चालू असल्याची तक्रार अन्नधान्य वितरण कार्यालयाला आल्याने अन्नधान्य वितरण अधिकारी रघुनाथ पोटे यांच्या आदेशानुसार दिनेश तावरे परिमंडळ अधिकारी चिंचवड ,गणेश सोमवंशी पुरवठा अधिकारी प्रशांत ओहोळ व बबन माने पुरवठा अधिकारी ,सुनिल कास्टेवाड लिपीक ,संतोष लिमकर, बाबासाहेब ठोंबरे व गणपत राजे तसेच वाकड स्टेशनचे पोलीस हवालदार पन्हाळे एस सी, व्ही टी खोमणे बी ए लाळगे व चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक श्री एस टी ढवळे व महिला पोलीस नाईक चौधरी यांच्या भरारी पथकांनी वाल्हेकरवाडी काळेवाडी,रहाटणी,चिंचवड,,डी वाय पाटील काॅलेज परिसरातील हाॅटेल स्नॅक्स सेंटर चायनीज सेंटर खानावळ व टपरीधारकावर कारवाई केली..या कारवाईत भारत गॅस सिलिंडर-29, हिन्दुस्तान कंपनीचे गॅस -13 व इंडेण कंपनीचे – 03 असे एकुण 45 सिलिंडर मिळाले .तसेच भारत पेट्रोलकंपनीचे पुणे दिपज्योतसिंग कार्यकारी व इंण्डेण कंपनीचे जगदीश टी सहा प्रबंधक यांच्या उपस्थितीत आदिती भारत गॅस एजन्सी काळेवाडी यांच्या कडे कायदेशीर रित्या सुपूर्त नामा तयार करून परिमंडळ अधिकारी व पुरवठा अधिकारी यांच्या समवेत सिलिंडर जमा केले. .जेव्हा पासून रघुनाथ पोटे यांनी अन्नधान्य वितरण अधिकारीपदाचे सूत्र हाती घेतले आहे तेव्हा पासून कारवाई जोरात चालू झाली असून अशीच एक कारवाई पुणे शहरातील ” ग” परिमंडळ विभागाने घरगुती सिलेंडर जप्त करून कारवाई केली होती.

Leave a Reply