(Pune dcp free biryani) त्या क्लिप मधील आवाज आणि वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखातीतील आवाज एकच असल्याची चर्चा
मला चिकन बिर्याणी आवडते तर तुमच्या साहेबांना मटन बिर्याणी.
(Pune dcp free biryani) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी : सध्या पुणे शहरात एसपी बिर्याणीची चर्चा सुरू आहे.
त्याला कारण आहे दोन दिवसांपासून पोलीस उपायुक्तांच्या नावाने व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप.
आपल्या हद्दीतील बिर्याणी खायची ते फुकटात अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत.
फुकटात बिर्याणी मागणारे अधिकारी हे पोलीस शिपाई / हवालदार नसून एक पोलीस उपायुक्त असल्याची चर्चा रंगली आहे .
ऑडिओ क्लिप
महिला अधिकारी -विश्रामबागच्या इथे नॉनव्हेज खूप चांगलं मिळतं असं ती म्हणत होती मला
पोलीस कर्मचारी-हो…
महिला अधिकारी -कुठे?
पोलीस कर्मचारी-ते मॅडम…एसपी बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी
महिला अधिकारी -बरं..अजून तेवढंच आहे?
पोलीस कर्मचारी-अजून एक मटण थाली म्हणून आहे कोल्हापूरची
महिला अधिकारी -बरं..जास्त चांगली कुठे आहे?
पोलीस कर्मचारी-साजूक तुपातली मॅडम…एसपी बिर्याणीची मॅडम..त्यांच्याकडे दोन दोन प्रकार आहेत..नल्ली निहारी म्हणून एक प्रकार आहे..
पोलीस कर्मचारी-ऑईली बिलकूल नाही..आणि साजूक तुपातली पण चांगली आहे मॅडम..कलर वगैरे नसतं त्यात..काही नाही
महिला अधिकारी -बरं जी एक चांगली असेल ती पाठवून द्याल सोनावणेकडे..जर काय याचा इश्यू असेल तर पीआयला सांगून द्याल मॅडमनं सांगितलं म्हणून..मी बोलू पीआयला
पोलीस कर्मचारी-नाही मॅडम करतो मी
महिला डीसीपी-नाही पण..त्याच्या हद्दीतलं आहे तर पैसे कशाला द्यायचे आपण..आपल्या हद्दीमध्ये पण पैसे द्यायचे का आपण?
पोलीस कर्मचारी-आपण यापूर्वी असं कधी केलं नव्हतं त्यांना..ठीक आहे मॅडम मी सांगतो..पीआयशी बोलतो आणि हे करून घेतो
महिला डीसीपी-मग तुम्ही काय करायचे?
पोलीस कर्मचारी– आपण कॅशच करायचो मॅडम
महिला अधिकारी -पे करून?
पोलीस कर्मचारी-हो मॅडम…पे करूनच
महिला अधिकारी -तेवढं करेल तो..त्यादिवशी मला बोलत होता एक हॉटेल आहे म्हणून…तेवढं करेल तो..त्याच्यात काय एवढं?
पोलीस कर्मचारी-येस मॅडम..मी सांगतो
महिला अधिकारी -नाहीतर दुसरं कोणी असेल..किंवा मी सांगते
पोलीस कर्मचारी-नाही मी बोलतो
महिला अधिकारी -त्यादिवशी मला बोलला तो..आम्ही तिथे फिरत होतोना तर मला बोलला..पण आपल्या हद्दीत आहे तर त्यासाठी का पैसे पे करायचे..आपल्या हद्दीतल्या गोष्टीसाठी कोणी पैसे पे करतं का?..मला माहीत नाही..
अश्या स्वरुपाचे ऑडिओ क्लिप व्हायरल झाले आहे.
video पहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा
ते जास्त प्रमाणात महाराष्ट्रात फिरत असल्याने त्या मॅडमची धडकीच भरली आहे.
सदरील क्लिप जुनी असल्याचे बोलले जात असली तरी मॅडमनी ती क्लिप खोटी असल्याची जाहिर करून टाकले आहे.
परंतु त्या क्लिप मधील आवाज व पुण्यातील वृत्त वाहिन्यांना दिलेली मुलाखतीतील आवाज एकच असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
तर यात काही बदल्यांचा राजकारण नसून प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी घेतलेला सावध पवित्रा असल्याचे बोलले जात आहे.
परंतु ती जुनी क्लिप आताच का व्हायरल करण्यात आली ? या मागे काही तरी कारण असणारच ? यात काही शंकाच नाही ?
तर दर महिन्याला लाखोंच्या घरात पगार घेणाऱ्या अधिका-यांची मानसिकता काय असेल ते ह्या व्हारल क्लिप मधून पुणेकरांसमोर आले आहे ?
सोशल मिडियावर त्या कर्मचाऱ्याची बाजु चांगलीच उचलून धरली जात आहे.तर अनेकांनी त्याला वेटर संबोधले आहे .
तर पोलीस उपायुक्तांवर कारवाईची मागणी अनेक संघटनेने केली असून सोशल मिडियावरही नेटक-यांनी कारवाईची मागणी केली आहे.
तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पुणे पोलीस आयुक्तांना चौकशी करून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी खुलासा मागवला असला तरी कारवाई होणार का ? असा प्रश्न देखील सोशल मिडियावर विचारला जात आहे.
नारनवरे ह्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असून जबाबदार पदावर काम करत असताना अंगावर वर्दी घातल्यानंतर घेतलेली शपथ त्यांनी पदोपदी आठवण ठेऊन जनसेवा जनतेचे रक्षण, देश हित ,भ्रष्टाचार मुक्त कारभार स्व आचरणातून पोलीस दलातील कनिष्ठ यांच्या पर्यंत तो आदर्श निर्माण करण्याची महत्वाची भूमिका त्यांनी स्वकर्तुत्वाने जोपासली पाहिजे मात्र त्यांच्या चिकन बिर्याणी हव्यासापोटी, विनामूल्य जेवणाची लालसा त्यांना व त्यांच्या पदां न शोभणारी नक्कीच आहे.या गंभीर प्रकरणाची चौकशी होईल,सत्य परिस्थिती व सत्य बाहेर नक्की येईल का ?यात ही मी स्वतः सा शंक नक्कीच आहे किंबहुना मी असे अनुभव 36 वर्षाच्या प्रदीर्घ पोलीस सेवेतून आजही घेत आहे नारनवरे पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1 पुणे यांच्याशी ज्या व्यक्तीने सभाषण केले व ते रेकॉर्डिंग करून सोशल मीडिया माध्यमातून वायरल केले त्यांनी स्वतः ते जबाबदारीने पोलीस दल प्रमुख यांच्या कडे देऊन स्वतःची ओळख करून देऊन पोलीस दलाच्या बदनामिस कारणीभूत असलेल्या पोलीस दलातील कोणत्याही पदांवरील वरिष्ठ अधिकारी ते कनिष्ठ यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे करता प्रयत्नशील राहिले पाहिजे पोलीस दलातील भ्रष्टाचार कार्य पद्धत रूढ करणाऱ्यांना योग्य धडा शिकवलाच पाहिजे.
सुनिल टोके : सहायक पोलीस उपनिरीक्षक मुंबई