सजग नागरिक टाइम्स :पुणे धानोरी: वीज मीटरच्या मंजुरीसाठी वीस हजाराची लाच मागून तडजोडीनंतर प्रत्यक्ष बारा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या महावितरण धानोरी शाखेच्या सहाय्यक महिला अभियंत्यांना लाच लुचपत विभागाकडून सापळा रचून अटक करण्यात आली.
याप्रकरणी महावितरण च्या धानोरी शाखेच्या सहाय्यक अभियंता श्रीमती हर्षाली ओम ढवळे (वय 38) यांना अटक करण्यात आली आहे.
महावितरणच्या महिला अभियंता अधिकाऱ्याने लाचेची मागणी करण्याच्या या गंभीर घटनेमुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
नागरिकांच्या छोट्या-मोठ्या कामासाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व दलाल वारंवार पैशाची मागणी करतात.
या त्रासामुळेच तक्रारदार यांनी महिला अधिकाऱ्याविरुद्ध लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
हेपण वाचा : फेजाने मदिना मस्जिद येथे कोंढवा पोलीसांच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती
तक्रारदार हे महावितरणच्या विद्युत ठेकेदाराकडे लायसनिंगच्या कामासाठी नोकरीस आहेत.
प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता सहाय्यक अभियंता हर्षाली ढवळे यांनी यापुर्वी केलेल्या 3 थ्री फेज विद्युत मीटर कामाचे व सध्याचे 1 थ्री फेजचे प्रलंबित वीज मीटर मंजुर करून देण्यासाठी तडजोडीअंती प्रत्येकी 3 हजार रूपये याप्रमाणे 12 हजार रूपयाची लाच मागितली हे निष्पन्न झाले.
तडजोडीनंतर या तक्रारीची पडताळणी करत असताना शनिवारी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास यामधील बारा हजार रुपये मागणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक पोलीस निरीक्षक श्रीमती प्रणिता सांगोलकर यांनी पथकासह सापळा रचून लाचेची मागणी करणाऱ्या महावितरणच्या महिला सहाय्यक अभियंता यांना अटक करण्यात आली आहे.
हेपण वाचा : भारतीय शेअर बाजाराचे 10 फॅक्ट : इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करण्याअगोदर जाणून घ्या