Homeताज्या घडामोडीकब्रस्तानच्या मागणीसाठी तिरडी आंदोलन

कब्रस्तानच्या मागणीसाठी तिरडी आंदोलन

पिंपरी चिचंवड महानगरपालिकेकडून कब्रस्तान संघर्ष समितीला लेखी पत्र

Sajag Nagrik Times: २१ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या थेरगाव ,काळेवाडी ,वाकड परिसरातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून कब्रस्तान संघर्ष समिती आक्रमक भूमिका घेत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार , पिंपरी चिचंवड महानगरपालकीचे आयुक्त राजेश पाटील यांना कब्रस्तान संघर्ष समिती कडून कब्रस्तानच्या मागणीचे निवेदन देण्यात आले होते.

काळेवाडी ,थेरगाव ,वाकड परिसरात मुस्लिम कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास दफन करण्यासाठी जागाच नसल्याने मुस्लिम बांधवांच्या मानवी अधिकाराचे उल्लंघन होत आहे.

वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनची उदासीनता दिसत असल्याने बुधवारी दि २३ मार्च २०२२ रोजी कब्रस्तान संघर्ष समितीने पत्रकार परिषद घेऊन पिंपरी चिचंवड महापालिकेवर तिरडी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार दि. २५ मार्च रोजी पिंपरी मधील क्रोमा शोरूम जवळ हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव जमा झाले होते. याठिकाणी हाजी गुलजार ,मौलाना अलीम अन्सारी ,

कारि इकबाल , मौलाना इस्लामुद्दीन यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानवजी कांबळे , मारुती भापकर , सतीश काळे ,धनाजी येळकर यांनी कब्रस्तानच्या मागणीसाठी आम्ही समिती सोबत असून त्यांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले .

यावेळी बोलताना समनव्यक सिद्दीकभाई शेख यांनी सांगितले कि, २१ वर्षांपासून प्रलंबित कब्रस्तानचा विषय तात्काळ मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन पालिकेकडून मिळालेले आहे.

कब्रस्तानचा विषय आश्वासन दिल्याप्रमाणे जलदगतीने न सुटल्यास पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उगारले जाईल.आंदोलनाच्या ठिकाणी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय जमा झालेला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणवर पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

सदर आंदोलनाची दाखल घेऊन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कब्रस्तान संघर्ष समितीची बैठक घेऊन मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानचा प्रश्न सोडवण्याबाबत हालचाली सुरु असल्याचे सांगितले .

पिंपरी चिचंवड महानगरपालिकेकडून सदरचे पत्र कब्रस्तान संघर्ष समितीचे समनव्यक सिद्दीकभाई शेख यांना देण्यात आले.

त्या पत्रामध्ये नमूद केले आहे कि, कब्रस्तानसाठी भूसंपादन करावयाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येईल. जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा करून जमीन ताब्यात घेतल्यावर दफनभूमी विकसनाचे काम महापालिकेमार्फत करण्यात येईल .

त्यामुळे पोलीस व प्रशासनच्या विंनतीला मान देऊन कब्रस्तान संघर्ष समितीचे सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

Share Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments