Homeब्रेकिंग न्यूजपुण्यातील खड्ड्यांवरून महापालिकेच्या मुख्यसभेत महाभारत

पुण्यातील खड्ड्यांवरून महापालिकेच्या मुख्यसभेत महाभारत

 जोरदार घोषणाबाजी करून  विरोधकांनी(pune corporation) सभागृहात चांगलाच गदारोळ केला,

potholes-in-pune-mahabharat-in-the-pune-corporation-general-assembly/

सजग नागरीक टाईम्स ; -(pune corporation):  खड्ड्यांमुळे पुणेकरांना वाहतूक विस्कळीत होणे व अनेक आजारांना सामोरे  जावे लागत आहे .

रस्त्यावरील खड्डयामुळे अपघात घडत असल्याने  जोरदार घोषणाबाजी करून  विरोधकांनी सभागृहात चांगलाच गदारोळ केला.

शहरात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे रस्त्यांना प्रचंड खड्डे पडले असून गुरूवारी महापालिकेच्या वतीने मुख्य सभेत तीव्र शब्दात पडसाद उमटले. 

तसेच शहरातील सर्व रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतुक कोंडी होऊन पूर्णपणे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे  .

याला सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला.

या मुख्य सभेत आऱोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना गदारोळात सभागृहनेते व उपमहापौर यांनी सत्ताधारी पक्षाची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.

हे पण पहा : एका पोलीस शिपाईचा अमानुषपणे खूण.Police Murder

या सभेत विरोधकांनी सुरुवातीपासूनच सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.

अनेक अपघातात सर्वसामान्यांचे बळीसुध्दा गेले आहे, तरीसुध्दा सत्ताधारी व प्रशासन ढिम्म अवस्थेत आहे.

शहरात सध्या खड्ड्यात रस्ते की रस्त्यांत खड्डे असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. नियोजन शुन्य कारभाराचे हे परिणाम आहे. असे विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले.

सजग च्या व्हिडीओ बातम्या पाहण्यासाठी क्लीक करा 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular