मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची अॅड वाजेद खान यांची मागणी*
सजग नागरिक टाइम्स : दि 12 ऑगस्ट 2017 रोजी पुणे शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते झाले. उदघाटनाच्या आदल्या दिवशी स्वागतासाठी येणाऱ्यासाठी मंडपची व्यवस्था केली होती .परंतु मंडपासाठी जागा अपुरी पडत असल्याने तेथे असलेले लिंबाचे व वडाचे झाडांची छाटणी केली गेली आणि फांद्या तोडल्या गेल्या. व ईतर हि झाडे तोडण्यात आल्याने व झाडे तोडणे गुन्हा असल्याने अॅड वाजेद खान यांनी पुणे महानगरपालिका मधील उद्यान विभागाला तक्रार केली होती.


परंतु थेट मुख्यमंत्रीच्या नावाने तक्रार असल्याने अधिकारी व कर्मचारी कारवाई करण्यास मागेपुढे करत होते शेवटी अॅड वाजेद खान यांनी माहिती अधिकाराचा अर्ज दाखल केल्यावर यंत्रणा कामाला लागली.परंतु दोन महिने उलटले तरी अद्याप कारवाई तर सोडाच साधे सदरील जागेचे पंचनामे देखील करण्यात आले नसल्याचे अॅड वाजेद खान यांनी सांगितले .तसेच एखाद्या वकिलाला असे अनुभव येत असतील तर सर्व सामान्यांचे काय हाल होत असतील असा प्रश्न अॅड वाजेद खान यांनी विचारला आहे .तातडीने दखल न घेतल्यास उद्यान विभागातच थांडमांडून आंदोलन करण्यात येईल असा ईशारा हि अॅड वाजेद खान यांनी सनाटा प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे.

Leave a Reply