Quarantine: आम्ही आजाराने मेलो असतो तर बर झाल असत अशी व्यथा या परिवाराने मांडली.
Quarantine :सजग नागरिक टाइम्स : पुणे : शिवाजीनगर गल्ली नंबर 5 पाटील इस्टेट मधील वस्तीत राहणा -या एका कुटुंबातील दोन जण कोरोना पोजीटीव असल्याचे निदान झाले होते,
त्यामुळे त्यांना १३ एप्रिल रोजी दवाखान्यात दाखल करण्यात आले , व दुसऱ्याच दिवशी त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ,
ते सर्व जन निगेटिव निघाल्याने त्याना क्वारंटाइन करण्यात आले .सदरील परिवाराने दवाखान्यात जाण्याआगोदर घराला एक मोठे कुलूप मारले होते .
या परिवारातील लोकांचा क्वारंटाइन संपल्याने त्याना 1 मे रोजी दुपारी 1 दरम्यान घरी सोडण्यात आले .
लॉकडाऊन मध्ये दीड लाख लोकांपर्यंत पोहोचविले अन्नधान्य,
ते सर्वजन घरी परतले असता त्यांना घराचा कुलूप बदललेला दिसला ,त्यांनी कुलूप तोडून आत गेले असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली ,
घरातील सर्व सामान अस्तव्यस्त पडलेले होते ,घरातील 32 इंची TV जागेवर नव्हते , कपडे भांडीकुंडी गॅस सिलेंडर चोरी झाल्याचे दिसले,
कपाटातील अंदाजे 4 तोळा सोने चांदीचे दागदागिने 7000 रुपये चोरी झाले,
याबद्दल खडकी पोलीस ठाण्याला तत्काळ खबर देण्यात आली असून खडकी पोलीसांनी 2 मे रोजी फिर्याद दाखल केली आहे.
शासन पुण्यातील 76000 परिवारांना क्वारंटाइन करण्याच्या तयारीत आहे,
यात सुमारे 3.5 लाख लोकं क्वारंटाइन होणार असल्याने पुण्यातील लोक संख्या मोठ्या प्रमाणात रिकामी होणार आहे ,
76000 घरे स्थलांतरित झाल्याने घरफोडी ,चो-या करणा-या भुरट्या चोरांना मोकळेरान मिळणार आहे.
या चोरांच्या हालचालींवर शासनाने लक्ष ठेऊन यांना वेळीच बंदिस्त केले तर नागरिकांचे संसार उध्वस्त होण्यापासून वाचणार अन्यथा नागरिकांचे जगणे कठीण होऊन जाईल.