(Ration shop keeper thief grain)लॉकडाऊनच्या काळात सामान्य नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला असून त्यांच्या तोंडचे अन्नधान्य पळविणा-या चोरांनवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
(Ration shop keeper thief grain) मे महिन्यात केंद्र व राज्य सरकारने मोफत धान्य दिले असले तरी दुकानदार घेत आहेत पैसे. अधिका-यांचे मात्र दुर्लक्ष.
सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी :
ई पॉस मशिन आल्यावर रेशनिंग दुकानदारांकडून धान्याची चोरी होणार नसल्याचा कांगावा सरकारकडून केला गेला असला तरी तो सपशेल फोल ठरला आहे.
दुकानदाराना किती ही सक्त मनाई केली तरी अधिकारी, कर्मचारी आणि दुकानदार यांच्या मिलीभगत असल्या शिवाय चोरी हे शक्य आहे का?
रेशनिंग दुकानदार रेशन चोरी करत नसेल तर मग ते दुकानदारच कसले ? (Ration shop keeper thief grain)
ई पॉस ऑनलाईन सिस्टीम आणूनही रेशनिंग दुकानदार नव नवीन शक्कल लढवून आज सरासर नागरिकांना धान्य कमी देत आहे.
अशीच काही तक्रार सजगकडे आल्याने त्याची खातरजमा केली असता रेशनिंग दुकानदारांकडून मापात पाप केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
अन्नधान्य ड” परिमंडळ विभागातील हडपसर सय्यदनगर येथील अमित जगताप या दुकानदाराकडील
पटेल या ग्राहकाच्या रेशनकार्ड मध्ये एकुण ५ नावे असून ऑनलाईनलाही पाचच नावे दिसत असले तरी पटेल यांना दरमहा ३ व्यक्तींचेच धान्य दिले जात आहे.
तर दोन व्यक्तींचे धान्य कमी का दिले जात आहे असा प्रश्न पटेल यांनी दुकानदाराला विचारला असता वरूनच कमी येत असल्याचे दुकानदाराने सांगितले.
परंतु ऑनलाईनला सर्वांच्या नावाने धान्य दिले असल्याचे दिसत आहे असे विचारल्यावर जगताप याने पुढे बोलण्यास टाळले.
जगताप हा गेल्या ३-४ वर्षांपासूनच धान्य कमी देत आहे.
आणि विषेश म्हणजे मे महिन्यात केंद्र व राज्य सरकारने धान्य मोफत दिले असतानाही जगताप यांने पटेल यांच्याकडून ४० रूपये घेतल्याचे पटेल यांनी सजग प्रतिनिधीला सांगितले आहे.
तर कोंढव्यातील सुप्रिया महिला बचत गट या रेशनिंग दुकानदाराकडील फारूख शेख
या ग्राहकाच्या रेशनकार्ड मध्ये ४ नावे असून ऑनलाईनलाही चारच नावे दिसून येत आहे.
परंतु सदरील दुकानदार शेख यांना दरमहा दोनच व्यक्तींचे धान्य देत असून दोन मुलांचे धान्य कमी देत आहे.
यासंदर्भात शेख यांनी विचारणा केली असता मुलांचे नावे ऑनलाईनला अपडेट झाले नसल्याचे सांगून दुकानदार धान्याची चोरी करत आहे.
ब” परिमंडळ विभागातील भवानी पेठ येथील दुकानदार क्षीरसागर हा या मे महिन्यात मोफत धान्य देणे बंधनकारक असताना
क्षीरसागर हा नागरिकांकडून धान्याचे पैसे घेत असल्याचे एका ग्राहकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
वाचा : पुण्यातील रेशनिंग दुकानदारांकडून शासन परिपत्रकाला केराची टोपली.!
मंगळवार पेठेतील झाशीची राणी महिला बचत गट दुकानदार हे नागरिकांना धान्य मोफत न देता पैसे स्विकारत आहे ,
व केंद्र शासनाच्या वतीने आलेले धान्य कमी देत असल्याचे एका महिला ग्राहकाने सांगितले.
तर भवानी पेठ काशेवाडी येथील रेशनिंग दुकानदार अंकुर बचतगटाने पण अल्लाउद्दीन शेख यांना धान्य कमी दिले आहे.
व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीतील महिला ग्राहक जोहराबी बागवान यांना
केंद्राचे व राज्याचे मिळून असे एकुण ७० किलो धान्य देणे बंधनकारक असताना ४० किलोच धान्य दिल्याचे बागवान यांनी सांगितले.
अश्या ब-याच नागरिकांच्या तक्रारी सजगकडे प्राप्त झाल्या आहेत.
गोरगरिबांचे धान्य चोरले जात असतानाही परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षकाचे कसे काय दुर्लक्ष होऊ शकते ?
दिवसभरात अश्या कितीतरी ग्राहकांच्या तोंडातील घास काळ्याबाजारात विकला जात आहे. (Ration shop keeper thief grain)
खरंतर मे महिन्याचे धान्य मोफत देणे बंधनकारक असताना दुकानदार कोणाच्या छत्रछायेखाली नागरिकांकडून रक्कम वसूल करत आहे.
यात अधिका-यांची तर मिलीभगत नाही ना ? आणि विषेश म्हणजे यातील काही दुकानदारांची दोन-दोन वेळा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी अनामत रक्कम जप्त केली आहे.
तरीही या दुकानदारांची चोरी थांबता थांबेना. धान्य चोरी संदर्भात दुकानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दुकानदार धान्य चोरी करत असल्याबद्दल अन्न धान्य ड ” ब” परिमंडळ अधिकारी मनोज दिघे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.