Homeताज्या घडामोडीलता औटी (वाघचौरे )यांनी केले महिनाभराचे रमजानचे रोजे

लता औटी (वाघचौरे )यांनी केले महिनाभराचे रमजानचे रोजे

completed 30 Roza of Ramadan : लता औटी (वाघचौरे) यांनी केले महिनाभराचे रमजानचे रोजे

Lata Auti (Waghchaure) completed 30 Roza of Ramadan

completed 30 Roza of Ramadan : सजग नागरिक टाइम्स :भारतभर कोरोनाचा कहर सुरु असताना काही समाजकंटकांनी देशात द्वेशपसरविण्याचे काम केले

व हिंदू मुस्लीम मध्ये तेड निर्माण करण्याचेच काम केले परंतु त्यांच्या द्वेशाला सडेतोड उत्तर आपल्या नागरिकांनी दिले आहे.

कोण कितीही द्वेश पसरविण्याचे कामे केले तरी आम्ही गुण्यागोविंदानेच राहणार असे लता ताईने सिद्ध केले.

शेवटचा अशरा मुक्तीचा

श्रीरामपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरपालिका शाळा क्रमांक सहा (अहिल्यादेवी नगर)

या शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीमती लता दत्तात्रय औटी उर्फ सौ. लता पोपटराव वाघचौरे मॅडम

यांनी पवित्र रमजान महिन्याच्या महिनाभराचे 30 रोजे यशस्वीरीत्या पूर्ण केले.याबद्दल समाजाच्या सर्व थरातून त्यांचे कौतुक होत आहे.

यासंदर्भात सौ .लताबाई वाघचौरे यांना विचारले असता मी पूर्वीपासून दरवर्षी रमजान महिन्यातील रोजे धरीत असते.

संयमाचा महिना – रमजान

यापूर्वी पंधरा-सोळा रोजे पर्यंत झाले होते. मात्र यावर्षी मनाचा निश्चय केला आणि पूर्ण महिनाभराचे रोजे पूर्ण झाले.

रमजान महिन्याचे रोजे धरणे मला लहानपणापासून मनापासून आवडते. हे रोजे धरल्यामुळे मला एकदम फ्रेश वाटत आहे असे ही त्यांनी सांगितले.

यावर्षी एवढा कडक उन्हाळा असताना सुद्धा तुम्ही सर्व रोजे कसे पूर्ण केले असे विचारले असता एकदा मनाचा निश्चय केला की अशक्य काही नाही असे त्यांनी सांगितले.

रमजान महिना सुरू होण्यापूर्वीच रोजा इफ्तार व सहेरी चे वेळापत्रक आपण प्राप्त केले होते आणि त्यानुसार वेळेचे पालन करीत हे रोजे पूर्ण केले.

यासाठी कुटुंबातील सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांना Ration मिळावे म्हणुन Mohammadiya Masjid Trust चा पुढाकार

वाकचौरे मॅडम यांनी रमजान महिन्याचे रोजे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख,

नगरसेविका सौ समीनाभाभी शेख,नगरसेविका जायदाबी कुरेशी, नगरसेवक ताराचंद रणदिवे, प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे,

शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण, किशोर शिंदे , दिलीप विळस्कर,सय्यद असलमभाई,

उर्दू शाळा क्रमांक चार, पाच व नऊ च्या सर्व शिक्षकांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular