Quarantine : लोकहित फाउंडेशन पुणे च्या प्रयत्नाला यश..
Quarantine : सजग नागरिक टाईम्स पुणे : पुण्यातील काही पेठ भाग /लोक दाट वस्तीचे असून सोशल डिसटंसिंग पाळणे अशक्य आहे ,
त्यामुळे मनपा शाळा किंवा स्टेडियम मध्ये तात्पुरती सोय करण्यासंदर्भात लोकहित फाउंडेशन णे पत्रव्यवहार केले होते.
पुण्यातील लोकहित फाउंडेशन पुणे चे संस्थापक अध्यक्ष अजहर अहमद खान यांनी दि १६ एप्रिल २०२० रोजी
महाराष्ट्र शासनाकडे व पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे महानगर पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती
त्याची दखल घेत खबरदारीचा उपाय म्हणून या दाट लोकवस्तीच्या भागावर महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे.
आझम कॅम्पस मस्जीदचे ६० बेडच्या क्वारंटाइन कक्षात रुपांतर
शहरात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आणि संशयित असलेल्या पाच क्षेत्रिय कार्यालयांमधील सुमारे ७१ हजार कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली.
महापालिकेच्या शाळा , खासगी मंगल कार्यालये, वसतीगृहांमध्ये या कुटुंबांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
भवानी पेठ , ढोले पाटील , कसबा पेठ , घोले रोड आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या भागातील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
शहरातील रुग्णसंख्येत या भागातील रहिवाशांचे सुमारे ७५ टक्के प्रमाण आहे.
तसेच एकूण मृत्युमुखी पडलेल्यांमध्येही याच भागातील रहिवाशांचे प्रमाण जास्त आहे.
त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या दाट लोकवस्तीच्या भागावर महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे.
Lockdown | नागरिकांना Ration मिळावे म्हणुन Mohammadiya Masjid Trust चा पुढाकार