Homeताज्या घडामोडीकोंढव्यात शॉक लागून 5 वर्षीय बालकाचा मृत्यू

कोंढव्यात शॉक लागून 5 वर्षीय बालकाचा मृत्यू

(Kondhwa nawajish park news) चुक ठेकेदाराची शिक्षा  शहजाद अमीर सय्यद या बालकाला का ?

Sajag nagrik times प्रतिनिधी : (Kondhwa nawajish park news) कोंढवा येथील नवाजिश पार्कगल्ली नंबर 10 येथे ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम चालू आहे, गेल्या 20 दिवसांपासून संथ गतीने काम चालू आहे.

 काम  करत असताना ठेकेदाराने व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या सुरक्षेबद्दल लापरवाइ करुन रस्ते खोदण्याचे काम चालू केले आहे.

 काम करत असताना संबंधितांनी कोणती दक्षता न घेतल्याने 5 वर्षाच्या शहजाद अमीर सय्यद या बालकाला आपला जीव गमवावा लागला .

डेनेज लाइन टाकण्यासाठी जेसिबीद्वारे रस्ते खोदाइचे काम चालू होते. या खोदाइमुळे नागरिकांना येजा करने अत्यंत कठीन झाले आहे.

रस्ते खोदताना त्या जेसिबीचा फटका विध्यूत वाहीनीच्या डीपीला बसला व त्यातील एक वायर कट झाली त्याकडे त्या जेसीबी वाल्याने व ठेकेदाराने दुर्लक्ष केले . व या दुर्लक्षाची शिक्षा 5 वर्षीय शहजाद अमीर सय्यद या बालकाला भोगावी लागली. 

रात्री 12.30 वाजता अंत्यविधीला नेताना

२ मार्च रोजी  दुपारी २ च्या सुमारास त्या कट झालेल्या वीज वाहिनीला 5 वर्षाच्या शहजाद अमीर सय्यद या बालकाचा हात लागला तो त्या विजेच्या धक्क्याने त्याचे जागीच निधन झाल्याची माहीती नागरिकांनी दिली.

या अपघाता नंतर कोंढवा भागात संतापाची लाट पसरली असून नागरिकांनी आमदार, नगरसेवक यांच्यावर पण संताप व्यक्त करून म्हंटले आहे कि  प्रत्येक कामाचे श्रेय घेणारे आमदार ,नगरसेवक या अपघातात मरण पावलेल्या मुलाच्या मृत्यूचे पण श्रेय घेणार का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे?

रस्ते खोदताना वायर कट झाली होती तर त्याची माहिती ठेकेदाराने एम.एस.ई.बी ला कळविणे जरुरीचे होते .जर तसे केले असते तर त्या निष्पाप बालकाचे जीव वाचले अस्ते.

काम सुरू करताना त्या कामाचे तपशीलवार फलक लावणे बंधन कारक आहे त्यात कंपनीचे नाव , अधिकारीचे नाव .संपर्क क्रमांक, कामाची माहिती लिहून ती लावणे बंधनकारक असून सध्या तसे फलक लावलेले कोठेच दिसत नाही तसेच या ठेकेदाराने सुद्धा लावले नव्हते.

काम चालू करण्यापूर्वी इन्शुरन्स काढने बंधन कारक आहे,जर या ठेकेदाराने इन्शुरन्स काढले असेल तर त्याचा लाभ या बालकाच्या घरच्याना मिळू शकतो.

ज्या अधिकारी व ठेकेदाराच्या हलगर्जीपणा मुळे त्या बालकाचे मृत्यू झाले त्यांच्यावर सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular