Bhavani peth : वर्क ऑर्डर निघून ३ महिने उलटले तरी कामाची सुरुवात नाही ,भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार,
Bhavani peth : सजग नागरिक टाईम्स : अजहर खान : पुणे महानगर पालिकेतील भोंगळ कारभार जेवढे बाहेर काढले जाईल तेवढे कमीच
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात कामाची वर्क ऑर्डर निघते परंतु बर्याचदा कामे न करता बिले दिली जात असल्याचे हि प्रकार घडत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले .
याला कारण अधिकारी व ठेकेदारांची मिलिभगत आहे अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच सदरील प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक १८ ब मधील ६३३ गंज पेठ परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी
दिनांक ६ डिसेंबर २०१९ रोजी जावक क्रमांक ६४०३ व ६४०४ अश्या दोन वर्क ऑर्डर
आय स्क्वेअर पावर टेक्नॉलॉजीला देण्यात आली आहे,
या ठेकेदाराला १० लाख रूपयांच्या कामाची वर्क ऑर्डर देत २ महिन्यात काम पूर्ण करण्याची अट घातली होती,
तर त्याच ठेकेदाराला मनपा मिळकती मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची वर्क ऑर्डर असे दोन्ही मिळून २०,००००० ( प्रत्येकी दहा लाख)
विहीत मुदतीत काम करण्याची आॅडर दिली होती. परंतु ठेकेदाराने अटि शर्ती धाब्यावर बसवून अद्यापही काम केले नसल्याचे उघडकीस आले आहे.
भवानी पेठेतील किती कामे एस्टीमेट व नियमानुसार चालतात याची बारकाईने तपासणी केली तर मनपा आयुक्त भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाला १ रुपयासुद्धा निधी देणार नाही ?
जर त्या ठेकेदाराला कामात रस नसेल व काम वेळेवर पूर्ण करण्याची ताकत नसेल तर अश्यांनी ठेके घेऊच नये ,
या बाबतीत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील शाखा अभियंता ओंकार गोहाड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले प्रभाग क्रमांक १८ ब चे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही
काम वेळेवर का करण्यात आले नाही याबद्दल विचारले असता ते म्हणाले कि विहित मुदतीत काम झाले नाही तरी मुदत वाढ देता येते.
याचाच अर्थ सदरील अधिकारी ठेकेदाराला पाठिशी घालण्याचे काम करत आहेत.यांना नागरिकांच्या जीवाशी व मालमत्तेशी काहीही देणे घेणे नाही.
यांना ठेकेदाराला पाठीशी घालण्यातच रस असल्याचे दिसते,
अश्या गैर जबाबदार अधिकारीवर कडक कारवाई करण्याची व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते करत आहे.
विशेष म्हणजे सजग प्रतिनिधींनी आवाज उचलला नसता तर सदरील कामाचे बिल होऊन पैसे सुद्धा हडप झाले असते.
व याचा नागरिकांना थांग पत्ता ही लागला नसता . वर्क ऑर्डरच्या अटि शर्ती मध्येच नमूद आहे विहित मुदतीत कामे पूर्ण झाली नाही तर कोणत्याही परिस्थितीत मुदत वाढ दिली जाणार नाही.
मग गोहाडे अटि व शर्तीला वाटाण्याच्या अक्षता लावत नाहियेत ना ? या प्रकरची चौकशी होण्याची अंत्यंत गरजेचे आहे.
याची पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड दखल घेतील का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विचारत आहे.
क्रमशः भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात १० लाखाचे काम २ ते ३ लाखात कसे उरकले जाते ? वाचा पुढील बातमीत
वर्क ऑर्डर मधील अटि शर्तीला वाटाण्याच्या अक्षता..हे आहेत अटि
१) पंधरा दिवसांच्या आत काम चालू नाही केल्यास काम करायचे नाही असे समजून आपले कोटेशन रद्द करण्यात येईल व नियमा प्रमाणे कारवाई करण्यात येईल.
२) सदर कामाची मुदत २ महिने राहील.
३) कोणत्याही परिस्थितीत मुदत वाढ दिली जाणार नाही.
काही ठिकाणी
[…] भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील साव… […]