देशात पुणे शहराला पहिला तर नवी मुंबई ला दुसरा क्रमांक
सजग नागरिक टाइम्स:Pune city news :देशातील 111 शहरामध्ये जगण्यायोग्य शहराच्या यादीमध्ये पुणे शहराला पहिला तर नवी मुंबई ला दुसरा क्रमांक मिळाला आहे.ही आनंदाची बाब आहे.या दोन्ही शहरात मागील पंधरा वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती.तिथे अनेक विकास कामे आणि पायाभूत सुविधा देण्यात आल्याअसल्याचे चेतन तुपे म्हणाले .
Pune video news : व्हिडीओ बातमी पाहण्यासाठी क्लीक करा .
व राष्ट्रवादीमुळे पुणे शहराचा प्रथम क्रमांक आणि नवी मुंबईचा दुसरा क्रमांक आला आहे असा दावा त्यांनी केला .यासाठी शरद पवार , अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे मागील पंधरा वर्षात पुणे शहराचा चेहरा मोहरा बद्दलता आला .याचा मला सार्थ अभिमान आहे.या सर्व कामाची पावती म्हणून 111 शहरामध्ये पुण्याचा एक नंबर आला आहे.हे केवळ राष्ट्रवादीमुळे शक्य झाले आहे असेही पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले .
तुमच्या प्रिय मित्रांना स्वातंत्र्यदिनाच्या सुंदर शुभेच्छा देण्यासाठी क्लिक करा