पुण्यातील छ.शिवाजी मार्केट व फॅशन स्ट्रीट मधील आगीची उच्चस्तरीय समिती गठीत करून तत्परतेने चौकशी करण्याची मागणी .

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

(Fashion Street ) लोकहित फाउंडेशन पुणे चे अजहर अहमद खान यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

(Fashion Street ) सजग नागरिक टाइम्स :

पुणे शहरातील अंत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बाजार पेठातील बाजाराचे ठिकाण म्हणजे पुणे कॅम्पातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट (मटन व फुड मार्केट)

व त्याच्या काही अंतरावरच असलेले फॅशन स्ट्रीट कापडांचे मार्केट हे दोन्ही मार्केट पुणे शहरातील सुप्रसिद्ध मार्केट आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये गेल्या १0 दिवसांपूर्वी रात्री आग लागली होती,

Advertisement

त्यात मोठ्या प्रमाणावर गाळेधारकांचे नुकसान झाले होते.

video पहा 👆

तर काल दि २६ मार्च २०२१ रोजी रात्री अंदाजे ११.१५ वाजता आग लागल्याने अंदाजे ४०० च्या पुढे दुकाने भस्मसात झाली आहे.

येत्या काही दिवसांवर विविध सण जवळ असून मोठ्या प्रमाणावर कपड्यांची खरेदी दुकानदारांनी केली होती.

परंतु त्या आगी मुळे लाखों-करोडोंचे नुकसान झाले आहे.

Advertisement
Advertisement

सध्या कोरोनाचा काळ सुरू असल्याने व अश्या मोठ्या आगीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना शासनाकडून त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी.

video पहा 👆

आणि हे आगी लागतातच कसे काय ? याची चौकशी होणे अंत्यंत गरजेचे आहे.

यात कोणाचे हात तर नाही ना? असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

तर या आगीत राजकारण तर नाही ना ? अशी चर्चा सुरू आहे.

Advertisement

असे पत्र लोकहित फाउंडेशन पुणे चे संस्थापक अध्यक्ष अजहर अहमद खान यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवून उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याची मागणी केली आहे .

वाचा : पुणे कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीटला भीषण आग,

One thought on “पुण्यातील छ.शिवाजी मार्केट व फॅशन स्ट्रीट मधील आगीची उच्चस्तरीय समिती गठीत करून तत्परतेने चौकशी करण्याची मागणी .

Comments are closed.