Sajag Nagrik Times: पुणे: कोंढवा भागातील कौसरबाग येथे पत्र्याचे शेड उभारून अनधिकृतपणे हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांवर पालिकेने आज सकाळी हातोडा चालवला आहे.
अचानक पणे कारवाई करण्यात आली असल्याने अनधिकृतपणे हॉटेल व्यावसाय करणाऱ्यांमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे.
बेकायदेशीरपणे बांधकाम होत असल्याने पुणे महानगर पालिकेकडे तक्रारी वाढल्याने पुणे महानगर पालिकेकडील बांधकाम विभागाने कारवाईचा सपाटा लावला आहे.
परंतु काही अनधिकृत पत्र्याचे शेडवर कारवाई करण्यात आली आहे तर काहींवर कारवाई झाली नसल्याने, तोंड बघून कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कारवाईचे नियम सर्वांना सारखे असताना फक्त काहीच पत्र्याचे शेडवर कारवाई केली गेल्याने अधिकाऱ्यांच्या कारवाईवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.