Homeताज्या घडामोडीमाजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल

माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल

सजग नागरिक टाइम्स: पुणे अन्नधान्य वितरण कार्यालयातील महिला अधिकाऱ्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत अन्नधान्य वितरण कार्यालयातील पुरवठा निरीक्षक महिला अधिकाऱ्याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

सुभाष जगताप हे तळजाई वसाहत भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत .

सुभाष जगताप त्यांच्या प्रभागातील नागरिकांचे शिधापत्रिकेचे काम घेऊन जुन्या जिल्हा परिषद कार्यालयातील अन्नधान्य वितरण कार्यालयात गेले होते .

त्यावेळी पुरवठा निरीक्षक महिला अधिकारी कार्यालयातील सहकाऱ्यांशी बोलत होत्या .

जगताप यांनी कार्यालयात आरडाओरडा केला . महिला अधिकाऱ्याशी हुज्जत घालून नोकरी घालवण्याची धमकी दिली .

जगताप यांनी कार्यालयातील सहकाऱ्यांसमोर अपमानित केल्याचे महिला अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे .

सुभाष जगताप यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा तसेच विनयभंग केल्या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला .

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular