शहरभर अंदाधुंद केली जाणारी सॅनिटायझेशन फवारणी थांबवा

Stop spraying sanitization : शहरभर अंदाधुंद केली जाणारी सॅनिटायझेशन फवारणी थांबवा, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी..

Stop spraying sanitization ,

Stop spraying sanitization : सजग नागरिक टाइम्स : फक्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरात सॅनिटायझेशन करण्याच्या गाईडलाईन्स असताना दाखवली केराची टोपली..

कोरोना वायरसने जगभरात थैमान घातले आहे त्यासाठी राज्य शासनाची तयारी जोमाने सुरू आहे.

तर पुणे महानगर पालिकाकडून सध्या सर्वत्र ठिकाणी सॅनिटायझेशनची फवारणी जोमाने सुरू आहे.

Advertisement

परंतू काही ठिकाणी गरज नसताना व शासनाच्या गाईडलाईन्स धाब्यावर बसवत सॅनिटायझेशन केले जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य संचालकांनी mass , sanitization संबंधात गाईडलाईन्स जारी केल्या आहेत,

त्याप्रमाणे फक्त पॉझिटिव्ह कोरोना रुग्णाचे घर सॅनिटाईज करणे अपेक्षित आहे, मात्र सध्या हे सॅनिटायझर (सोडियम हायपोक्लोराईड) शहरात कोठेही विनाकारण फवारले जात आहे.

Advertisement

पुण्यात कोरोना व्हायरसचा पहिला बळी: कोरोनाबाधितांची संख्या 215

ज्यामुळे आधीच तुटपुंज्या असलेल्या महापालिकेच्या आरोग्यसेवकांवर विनाकारण अतिरिक्त तणाव येतो आहेच शिवाय हे सॅनिटायझर वायाही जात आहे.

नागरिकांच्या मागणीवरून हे केले जात असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

आता यासंदर्भात ज्यांनी नागरिकांचे प्रबोधन करायचे ते लोकप्रतिनिधीच या सार्वजनिक फवारणीसाठी आग्रह धरत आहेत

आणि काही तर यात पुढाकार घेऊन त्याचे फोटो समाजमाध्यमांवर टाकत आहेत.

या अंदाधुंद फवारणीमुळे नागरिकांमध्ये भ्रामक सुरक्षिततेची भावना पसरून ते निष्काळजी होण्याची भीती आहे.

Advertisement

आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी यांना शासनाच्या गाईडलाईन्स समजावून सांगाव्यात

आणि आम जनतेला मिडिया व सोशल मीडिया च्या माध्यमातून या mass , sanitization संकल्पने मागची भुमिका आणि उपयुक्तता तसेच मर्यादा समजावून द्याव्यात

जेणेकरून नागरिकही अंदाधुंद फवारणीची मागणी करणार नाहीत अशी मागणी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी पुणे महानगर पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Advertisement

CoronaVirus संदर्भात pune Police चे नागरिकांना भावनिक अव्हान|दत्तवाडी पोलिसांनी गाण्यातुन दिला संदेश

telegram