ताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील लुल्लानगरमधील हॉटेलला आग

Advertisement

पुणे : पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली आहे. पुणे शहरातील लुल्ला नगर परिसरात असणाऱ्या एका प्रसिद्ध हॉटेलला हि भीषण आग लागली आहे.

हे हॉटेल इमारतीच्या सातव्या मजल्यावर आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

Advertisement

सकाळच्या सुमारास हि भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल झाल्या आहेत.

या आगीने काही क्षणात रौद्ररुपधारक केले आहे. आगीचे लोट पसरत चालले आहे. आग लागल्यानंतर सिलेंडर स्फोटाचेही आवाज मोठ्या प्रमाणात आले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Share Now