भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार , रात्री डांबरीकरण केले व सकाळी खोदले.

Bhavani peth news : रात्री डांबरीकरण केले व सकाळी खोदले.

Bhavani peth news 2020

Bhavani peth news : सजग नागरिक टाईम्स : अजहर खान, पुणे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे

काहि ठिकाणी वर्क ऑर्डर निघाली नसताना हि राजरोसपणे कामे सुरू असून क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी मात्र दुर्लक्ष करताना दिसत असले तरी उपायुक्त मात्र कानाडोळा करत आहेत.

यामुळेच आंधळा दळतंय कुत्रा पीठ खातय ? म्हण्याची वेळ आली आहे.

Advertisement

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक १९ मधील अलंकार मेडिकल ते चुडामन तालीम पर्यंत व तेथून ताज बेकरी पर्यंत १९ मार्च रोजी रात्री डांबरीकरण करण्यात आले,

परंतु १२ तास हि झाले नसताना सदरील रस्ता खोदून जनतेच्या पैश्याची उधळपट्टी केली आहे. त्यात अधिकारी व कर्मचारी मुग गिळून गप्प बसले आहे.

अखेर निर्भयाच्या दोषींना दिली फाशी

Advertisement

लाखो रुपयांचे नुकसान करणा-या विरोधात कारवाई करण्याचे सोडून हद्द वाद निर्माण करून एका प्रकारे ठेकेदाराला पाठिशी घालण्याचे काम केले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

प्रभाग क्रमांक १९ मध्ये डांबरीकरण केले मात्र प्रभाग क्रमांक २० मधील ठेकेदाराने ते खोदले.

डांबरीकरण केल्यानंतर रस्ता खोदणा-या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Advertisement

तर महानगरपालिकेचे नुकसान करून खोदकाम करणा-या मशिनी जप्त का करण्यात आल्या नाहीत असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नागरिकांच्या पैश्यांची उधळपट्टी करणा-या अधिका-यांन विरोधात कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे

तर त्वरित कारवाई न झाल्यास काही सामाजिक संघटनांनी ३१ मार्च नंतर आंदोलनाचा इशारा दिला.

Advertisement

या संदर्भात अधिक माहितीसाठी उपअभियंता बाळासाहेब टूले यांच्याशी संपर्क केला असता फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

उपायुक्त महादेव देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले या संदर्भात मला माहित नाही माहिती घेऊन कळवितो .

Traffic Police चा भोंगळ कारभार | CCTV Camera झाकून No Parking मधिल वाहणांवर कारवाई ?

Advertisement
telegram