काँग्रेस,शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचेच बनणार सरकार : शरद पवार

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

Congress ShivSena NCP : फेसबुक वर शरद पवार यांच्या अकाउंट वरून एक पोस्ट शेयर करण्यात आली आहे,

congress-shivsena-ncp-will-be-the-government-of-the-three-parties-sharad-pawar

Congress ShivSena NCP :त्या पोस्टमध्ये काय म्हंटले आहे हे जाणून घेऊ या

महाराष्ट्रात राज्य सरकार बनवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांनी एकत्र बसून सरकार बनवण्याची तयारी केली होती.

(Congress ShivSena NCP) आमच्याकडे शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ व काँग्रेसचे ४४ अशी १५४ ही आमदारांची संख्या अधिक

तिन्ही पक्षांचे सहभागी व पाठिंबा दिलेले आणखी काही अपक्ष सभासद मिळून ही संख्या १६९-७० च्या आसपास जाते.

Advertisement

सकाळी साडेसहा-पावणेसातला एका सहकाऱ्याने टेलिफोन करून कळवले की आम्हाला इथे राजभवनला आणले गेले आहे.

एवढ्या सकाळी मा. राज्यपाल बाकीचे सगळे कार्यक्रम सोडून तयार होते, महाराष्ट्राच्या राजभवनाची कार्यक्षमता फारच वाढली याचा मला आनंद झाला.

महिती घेतल्यावर कळलं की अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे काही सदस्य त्याठिकाणी गेले आहेत.

नंतर टेलिव्हिजनवर पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

हा जो काही निर्णय अजित पवार यांचा आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणाच्या पूर्णपणे विरोधात आहे.

Advertisement

एकाप्रकारे हा शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र अशा प्रकारचा निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाचा सभासद असो किंवा राज्यात काम करणारा कुठलाही कार्यकर्ता असो.

जो प्रामाणिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पक्षाच्या सोबत सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी राहणार नाही याचा मला विश्वास वाटतो.

आपल्या देशात पक्षांतरबंदी कायदा आहे. या कायद्याच्या तरतुदी बाहेर पडणाऱ्या सदस्यांना लागू होतात. त्यांचं सदस्यत्व जाण्याचा धोका आहे.

महाराष्ट्रात जनमत भारतीय जनता पक्षाच्या विरोधी आहे. सर्वसामान्य माणूस त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाही.

सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणुका घेतल्या तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीने

Advertisement

त्या व्यक्तीचा पराभव करण्याची काळजी या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घेतली जाईल याचा मला विश्वास आहे.

आमच्या माहितीप्रमाणे १० ते ११ सदस्य त्या शपथविधीमध्ये सामील झाले होते. ते सदस्य कोण त्यासंदर्भात फोटो व टेलिव्हिजन पाहिल्यानंतर लक्षात आलेलं आहे

आणि हा प्रकार घडल्यानंतर त्यातील काही सदस्यांनी आमच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे.

congress-shivsena-ncp-will-be-the-government-of-the-three-parties-sharad-pawar

उदा. डॉ. शिंगणे जे बुलडाणा जिल्ह्यातून निर्वाचित आमदार आहेत. राजभवनावरून त्यांची सुटका झाल्यानंतर ते माझ्या घरी आले.

Advertisement
Advertisement

या पत्रकार परिषदेत डॉ. शिंगणेंसह संदीप क्षीरसागर, सुनील भुसारा या आमदारांनी त्यांना कशाप्रकारे अंधारात ठेवून अजाणतेपणे राजभवनावर नेलं गेलं हे विशद केले.

आणखी काही आमदार याच मनस्थितीत अजाणतेपणे गेले होते असं त्यांनी दूरध्वनीवरून कळवलेलं आहे.

प्रत्येक पक्षाने आपल्या निर्वाचित सदस्यांची यादी करून त्यांच्या सह्या घेऊन आपल्याकडे घेऊन ठेवल्या होत्या.

माझ्याकडेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्वाचित झालेल्या ५४ सदस्यांची याद्या आहेत.

Advertisement
पैकी दोन याद्या विधिमंडळाचा नेता म्हणून अजित पवार यांनी आपल्या ताब्यात घेतल्या आणि आमचा असा अंदाज आहे की

कदाचित त्यांनी त्या राज्यपालांना सादर केल्या असण्याची शक्यता आहे.त्या आधारावर राज्यपालांनी आकडा पूर्ण झाला असं समजून शपथ दिली असावी.

असं जर असेल तर त्या सह्या पक्षाच्या अंतर्गत कार्यक्रमासाठी घेतलेल्या होत्या. त्या हे नवीन काहीतरी सरकार बनवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी नव्हत्या.

या ५४ जणांचा पाठिंबा त्यांना आहे असं भासवलं आहे का याची मला खात्री नाही पण मला शंका आहे

आणि तसं असेल तर तीसुद्धा माननीय राज्यपालांची फसवणूक झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement

विडिओ पाहण्यासाठी क्लिक करा : भाजपा व राष्ट्रवादीच्या ? सत्ता स्थापनेनंतर सोशल मेडीयावर नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया

संबंध स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि सदस्य पुन्हा परत येण्याच्या बाबतीत खबरदारी घेताना दिसत असल्यानंतर मला स्वतःला पूर्णपणाने विश्वास आहे की

उद्याच्याला मा. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याच्या दृष्टीने जो दिवस सांगितलेला आहे त्यादिवशी त्यांना सदनामध्ये बहुमत स्पष्ट करता येणार नाही.त्यासाठी आवश्यक ती फिगर त्यांच्याकडे नाही.

आणि त्याबाबतीत एकदा स्पष्टता आल्यानंतर पुन्हा एकदा सरकार बनवण्याच्या दृष्टीने आम्हा तिन्ही पक्षांनी जी खबरदारी घ्यायची आहे ती घेतली जाईल.

Advertisement

या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे राहावं या निष्कर्षाशी आम्ही सहमती केली आहे. आणि त्यादष्टीने आम्हा तिन्ही पक्षांसह महाआघाडीतले सर्वजण एकत्र आहोत आणि एकत्र राहणार,

आणि कसलंही संकट आलं तर त्या संकटाला सामोरं जाण्याची या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाची तयारी आहे.

हेपण वाचा : अप्पर डेपोजवळ शहिद टीपू सूलतान जयंती उत्साहात साजरी

One thought on “काँग्रेस,शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचेच बनणार सरकार : शरद पवार

Comments are closed.