Sajag Nagrikk Times:
पुणे : अग्निशमन दलातील दुचाकीस्वार जवान नवनाथ मांढरे हे नायलॉन मांज्यामुळे जखमी झाल्याची घटना मंगळवारी गुलटेकडीतील उड्डाणपुलावर घडली .
मांढरेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत . मांढरे मंगळवारी दुपारी कोंढवा येथील अग्निशमन केंद्रात निघाले होते .
गुलटेकडीतील उड्डाणपुलावर नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार नवनाथ मांढरे यांच्या गळ्याला दुखापत झाली .
रक्तस्त्राव झाल्याने नवनाथ
मांढरे यांना चक्कर आली . त्यांनी उड्ड ाणपुलावर लटकणारा मांजा गोळा केला .
त्यांच्या मदतीला कोणी न आल्याने त्यांनी अग्निशमन ” दलातील सहकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली .