Homeताज्या घडामोडीज्वेलर्स कडून बारा लोकांची फसवणूक चौदा लाखांचा गंडा घातल्याचे तपासात उघड.

ज्वेलर्स कडून बारा लोकांची फसवणूक चौदा लाखांचा गंडा घातल्याचे तपासात उघड.

पुणे:प्रतिनिधी : कमी टक्के व्याज दराने पैसे देण्याच्या बहाण्याने नागरिकांकडील दागिने ताब्यात घेऊन परत न देता एका ज्वेलर्सने 12 लोकांची फसवणूक केली आहे. त्याने एकूण 14 लाखांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही घटना जानेवारी 2018 पासून ऑक्टोबर 2022 या कालावधीत वारजे माळवाडी येथील श्री उदावंत ब्रदर्स सराफ मनीलेंडर्स दुकानात घडली आहे.

दिलीप किसनराव उदावंत असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ज्वेलर्सचे नाव आहे, याप्रकरणी विलास कडू (वय ३२, रा. नऱ्हे) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.विलास कडू यांनी ज्वेलर्स दिलीप उदावंत याच्याकडून शेकडा तीन टक्के व्याजाने ४० हजार रूपये घेतले होते. त्याबदल्यात उदावंतने त्यांच्याकडून १७ ग्रॅम सोन्याचे दागिने तारण ठेवले होते,

काही महिन्यांनी विलासने ८५ हजार रूपये परत करूनही ज्वेलर्स दिलीपने त्यांचे तारण ठेवलेले दागिने माघारी न देता फसवणूक करून त्यांचे दागिने लुबाडण्याचा प्रयत्न केला मात्र कडू यांनी तक्रार केल्यानंतर त्या ज्वेलर्स च्या दुकान मालकावर गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने विचारपूस केली असता अजून त्याने इतर ११ जणांची अशाच पद्धतीने फसवणूक करून १४ लाखांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करत आहेत.

Share Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments