Homeपुणेसय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार ?

सय्यदनगर मधिल शाळेने विद्यार्थीनीचे नाव व धर्म बदलल्याचा धक्कादायक प्रकार ?

Sonawane’s demand : शाळा व्यवस्थापना वर ॲट्रॉसिटी व इतर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सोणावने यांची मागणी.

Sonawane’s demand : सजग नागरिक टाइम्स :

पुणे ; हडपसर सय्यद नगर येथील आयडीयल एज्युकेशन ट्रस्ट संचालित यासीन इनामदार विद्यामंदिर,

या शाळेच्या व्यवस्थापनाने साक्षी सुनील सोनवणे या विद्यार्थीनीचे धर्म व नाव बदलून तिला सना बाबा शेख असे नाव दिल्यांच आरोप सुनिता सोनावणे यांनी केले आहे ?,

या नावामुळे तिचे 11वीचे शैक्षणिक वर्ष व आयुष्य बरबाद होत आहे.

एखादा काना मात्रा चुकलातर आपण त्याला चुक समजु शकतो पण येथे तर नाव व धर्म बदलले गेले?

ही चुक नव्हे बळजबरी झाली.अश्यांवर तर कारवाई झालीच पाहिजे.

सदरील विद्यार्थिनीने समता प्राथमिक विद्यामंदीर या शाळेत सहावी मध्ये प्रवेश घेतला होता,

व पुढील शिक्षण यासिन इनामदार विद्यालयात केले.तिचे नाव साक्षी सुनील सोनवणे असे आहे ,

परंतु शाळेने तिचे नाव व धर्म बदलले असल्याचे तिची आई सुनिता सोनवणे यांनी तक्रारीत म्हटले आहे .

नाव बदल्याची माहिती मिळताच सुनिता सोनवणे हे मागील चार वर्षांपासून नाव बदलुन मिळण्यासाठी पाठपुरावा करत असून

ट्रस्ट चे अध्यक्ष शफी इनामदार व त्याच्या मुलांनी त्या अल्पवयीन मुली समोर मनास लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले,

क्यो बिना वजह नाम बदली कर रहे हो ,बच्ची का नाम मत बदलो तुम्हारी बच्ची की शादी मै हमारे मजहब मे कराता हु, मै शादी का खर्च भी करता हु फिकर मत करो , मै विधवा औरतों की मदत करता हु ,

असे बोलून त्या विधवा महिलेचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न केला असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

सदरील व्यक्तीवर ऍट्रॉसिटी अंतर्गत व इतर फौजदारी कलमान्वये कारवाई करण्याची मागणी सुनिता सोनवणे यांनी केली आहे.

हेपण वाचा :

वीज चोरी केल्याप्रकरणी हडपसर मधील “शिक्षणसम्राटा ”वर महावितरणची कारवाई..!

केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविले आयडियल एज्युकेशन ट्रस्ट चे चौकशी अहवाल,

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular