Homeताज्या घडामोडीपुणे शहर वाहतुक पोलीसांकडून कलम 207 चा चुकिचा बडगा?

पुणे शहर वाहतुक पोलीसांकडून कलम 207 चा चुकिचा बडगा?

Pune traffice police news :अजहर खान; पुणे शहर ट्राफिक पोलीस कधी कोणता नियम लावतील याचा काहि नेम नाही,

नविन नविन नियम लावून नागरिकांची पिळवणूक करणे हे रोजचेच,

पुणे शहारात सध्या हेल्मेट सक्ती कारवाई व थकीत असलेले ई चलन दंड वसूल करण्याचे काम वाहतुक पोलीसांकडून जोमाने सुरू आहे,

त्यात CCTV फुटेज मध्ये नियम मोडलेल्यांची संख्या जास्त आहे ,

दंडाची रक्कम जास्त असल्याने वाहतुक पोलिस आता थेट वाहनांना जॅमर लावण्याचे प्रकार देखील करत आहेत,

याचीच माहिती सनाटा प्रतिनिधींने आरटीआय मध्ये घेतली असता वाहतुक पोलिस करत असलेल्या चुकिचे कारवाईचे पितळ उघडे पडले आहे,

झेब्रा क्राॅसिंग, सिंगनल कटिंग, नो पार्किंग, हेल्मेट, इत्यादी स्वरूपाचे ई चलन दंड पेनडींग असेल तर दंड भरले नाही म्हणून वाहन जप्त करण्याचा अधिकार वाहतुक पोलीसांना आहे का?

त्या संदर्भातील प्रत मिळणे संदर्भात सनाटा प्रतिनिधी ने आरटीआय मध्ये पुणे शहर वाहतुक पोलीस व पुणे प्रादेशिक परिवहन कार्याल याकडे माहिती मागितली होती ,

पुणे शहर वाहतुक विभागातील जनमाहिती अधिकारी प्रभाकर ढमाले यांनी कलम 207 अन्वये वाहन ताब्यात घेण्याचा अधिकार आहे व सदरचे पुस्तक बाजारात उपलब्ध असल्याचे म्हटले होते,

हेपण वाचा :पुणे वाहतुक पोलिसांकडून रिक्षा चालकांची पिळवणूक

तसेच प्रथम अपिल दाखल केल्यावर कलम 207 कायद्याची प्रत देण्यात आली

तर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) चे जनमाहिती अधिकारी महेश देवकाते यांनी सुद्धा कलम 207 चीच रट लावून कायद्याची प्रत दिली,

दोन्ही कडून मिळालेल्या माहितीचे अवलोकन केले असता दोन्ही विभागाकडून एकच उत्तर होते ते 207….!

हेपण वाचा :पुणे शहर Traffice विभागालाच Helmetची व्याख्या माहिती नाही

परंतु कलम 207 चा व ई चलन दंड पेंडींगचा लांब लांब पर्यंत काहिच संबंध नसल्याचे दिसून आले,

परंतु दोन्ही जनमाहिती अधिकारी यांनी 207 कलम नेमके काय आहे हे पाहणी देखील केलेली नाही,

वाहतुक पोलिसांच्या या चुकिच्या कारभारामुळे नागरिकांचा रोष वाढत आहे याची दखल वाहतुक पोलिस उपायुक्त स्वता घेणार का

असा प्रश्न देखील पुणेकरांकडून विचारला जात आहे,

या संदर्भात वाहतुक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते होऊ शकला नाही

   काय आहे कलम 207?

परंतु 207 या कलमात ई चलन दंड पेंडींग असेल तर वाहने अडवून ठेवता येते असे कोठेही उल्लेख नाही ..

याचाच अर्थ वाहतुक पोलिसांकडून मनमर्जी पणे कलमे लावून नागरिकांची पिळवणूक केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे,

वाहन चालविणा-याकडे लायसेन्स नसणे, आरसी नसणे,विना रजिस्ट्रेशन वाहने चालविणे, परमीट नसणे, पासिंग नसणे,

आणि पोलीसांना दाखविणे आवश्यक असणारे कागदपत्रे नसल्यास मोटर व्हेकलअॅक्ट 1955 चे कलम 207 अन्वये कारवाई होऊ शकते

परमीट, विना रजिस्ट्रेशन, विना पासिंग व वाहन धारकाकडे कोणत्या हि स्वरूपाचे कागदपत्रे नसतील तर ते पोलीसांना आणुन दाखवून वाहने घेऊन जाऊ शकतात..संजय राऊत, प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे,”

Share Now
RELATED ARTICLES

2 COMMENTS

Most Popular

Recent Comments