काँग्रेस तर्फे जन आक्रोश मोर्चा व नोटबंदी मध्ये मृत्यू पडलेल्या लोकांना श्रद्धांजली

सजग नागरिक टाइम्स:मागील वर्षी 8 नोव्हेंबर रोजी मोदी सरकारने अचानकपणे ५०० व १००० च्या नोट बंदीची घोषणा करून ५०० व १००० च्या नोटा बंदी केले होते त्या नोटबंदी ला एक वर्ष पूर्ण झाले आहे.


त्या नोट बंदीमुळे अनेक नागरिकांना जीव गमवावे लागले तर काही लोक करोडपती वरून रातोरात रोडपती झाले असून सर्वसामान्य जनतेला वर्षभरात झालेल्या त्रासाचा निषेध करण्यासाठी पुणे शहर काँग्रेस तर्फे ८ नोव्हेंबर २०१७ रोजी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता,तसेच नोटबंदी मध्ये मृत्यू पडलेल्या लोकांना श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,दोन्ही कार्यक्रमला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, व ‘आली रे आली मोदी आता तुझी बारी आली’ असे नागरिकांनी घोषणा दिल्या.या मोर्चात काँग्रेसचे जुने व नवीन नेते कार्यकर्ते उपस्थित होते .

telegram

Leave a Reply