दोन तडीपारा सहीत तीन गुंड घातक हत्यारा सहित जेरबंद(crime branch news)
सजग नागरीक टाइम्स:crime branch news:पुणे पोलीस आयुक्त डॉक्टर के. वेंकटेशम, व पोलीस सहआयुक्त पुणे रवींद्र शिसवे यांनी पुणे शहरामध्ये सुरू असलेल्या गणेशोत्सवामध्ये
कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून व उत्सव शांततेत पार पडावा म्हणून Police अभिलेखावरील गुंड (gangsters),
फरारी आरोपी व पाहिजे असलेले तडीपार गुन्हेगार, यांचा शोध घेऊन त्यांच्या हालचालीवर नजर ठेवून त्यांचे विरोधात कठोर कारवाई करणे बाबत सर्व पोलिस अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे.
गुन्हे शाखा युनिट तीन-पुणे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी अभिलेखा वरील गुंड, फरारी, पाहिजे व तडीपार असलेल्या गुन्हेगारांची माहिती काढून त्यांचा शोध घेत असताना,
दिनांक 3 /9 /2019 रोजी पोलिसांना खब-याकडून मिळालेल्या माहितीवरून
खडक पोलीस स्टेशन पुणे यांनी पुणे शहर व जिल्ह्यांमधून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेला गुंड अजिंक्य सुरेश शिंदे वय 22 राहणार लोहियानगर (lohia nagar)
यास प्राणघातक शस्त्रांसह रविवारपेठ पागा गणेश मंदिर जवळ पकडण्यात आलेले आहे.
त्याच्या विरुद्ध यापूर्वी स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे येथे सन 2018 मध्ये खुणाच्या प्रयत्नाचा तसेच खडक पोलीस स्टेशन पुणे येथे खुणाचा प्रयत्नाचा एक,
गंभीर दुखापतीचा एक, विनयभंगाचा एक, अमली पदार्थ जवळ बाळण्याचा एक, असे एकूण पाच गुन्हे दाखल आहे,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 पुणे शहर याने त्यास दिनांक 21/३/2017 पासून दोन वर्षासाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला गुंड इसम नामे गंग्या उर्फ विकी विष्णू आखाडे वय22 राहणार वारजे माळवाडी पुणे,(warje malwadi pune)
यास महाडा कॉलनी वारजे माळवाडी पुणे येथे पकडण्यात आलेले आहे.
पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन पुणे शहर यांनी त्यास दिनांक 2/4/2019 पासून एक वर्षासाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
त्याच्या विरुद्ध वारजे माळवाडी पोलिस स्टेशन पुणे येथे खुणाचा प्रयत्नाचा एक, दरोड्याचा एक, गंभीर दुखापती चे दोन, असे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सराईत गुंड सोमनाथ नवनाथ अवघडे वय 21 राहणार केळेवाडी कोथरूड पुणे,
यास मिळालेल्या माहितीवरून केळेवाडी बाल शिवाजी मित्र मंडळ जवळ कोथरूड(kothrud) पुणे या ठिकाणी पकडण्यात आलेले आहे.
त्यावेळी त्याच्या ताब्यातून कोयत्या सारखे प्राणघातक शस्त्र जप्त करण्यात आलेले आहे.
त्याचे विरोधात कोथरूड पोलीस स्टेशन पुणे येथे खुणाचा प्रयत्नचा एक, व गंभीर दुखापतीचा एक, असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहे.
दिनांक 1/9/2019 रोजी त्याच्याविरुद्ध सीआरपीसी 151(3) प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
न्यायालयाने त्यास गणेशोत्सव कालावधीमध्ये स्थानिक पोलिस स्टेशनच्या हद्दीत न राहता
स्वतःचे वर्तन चांगले ठेवून इतर ठिकाणी राहण्यास जावे व ज्या ठिकाणी राहणार आहे.
तेथील नातेवाईक मित्र यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, संबंधित पोलिसांना द्यावेत असे आदेश दिलेले आहेत.परंतु त्याने सदर आदेशाचा भंग केलेला आहे.
वरील प्रमाणे पोलिसांनी गुन्हेगाराच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याच्याविरुद्ध कारवाई केलेली आहे.
तसेच यापुढे पोलीस अभिलेखा वरील गुंड गुन्हेगार यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
सदरील कामगिरी गुन्हे शाखा पुणे शहर चे अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे,
पोलीस उप आयुक्त गुन्हे. पुणे शहर बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे पुणे डॉक्टर शिवाजी पवार,
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (pi) राजेंद्र मोकाशी,
(psi)पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, हिमालय जोशी, व गुन्हे युनिट तीन पथकातील पोलिस कर्मचारी प्रवीण तापकीर,
संदीप तळेकर,अतुल साठे,सचिन गायकवाड, रामदास गोणते, मच्छिंद्र वाळके, रोहिदास लवांडे, शकील शेख,
राहुल घाडगे, दत्तात्रय गरूड,दिपक मते यांनी मिळून ही कारवाई केली आहे.
हेपण वाचा :सदरिल मृत महीलेचे शव(Death Body) अंत्यविधीसाठी नातेवाईकांनी घेऊन जाण्याचे पोलिसांचे अव्हान