Appointment of Inquiry Officer : सदरील नियुक्तीचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक)डाॅ गणपत मोरे यांनी काढले आदेश.
सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी,Appointment of Inquiry Officer:पुणे हडपसर सय्यदनगर/ गुलामअलीनगर जवळील बहुचर्चित वादाच्या भोव-यात अडकलेली आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित शाळा
अलजदीद उर्दू हायस्कूलची चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश सुधाकर पाखरे उप शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना शिक्षणाधिकारी माध्यमिक गणपत मोरे यांनी दिले आहेत.
हकीकत अशी कि अलजदीद उर्दू हायस्कूल मधील कनिष्ठ लेखनिक ह्या शासनाकडून पगार घेत असून त्या महिला कर्मचारी सदरील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या बाॅडी मध्ये सभासद आहे.
तर सदरील ज्या जाग्यावर आयडियल एज्युकेशन ट्रस्टची शाळा चालू आहे त्या इमारतीचे टॅक्स पुणे महानगरपालिकेत सदरील महिला कनिष्ठ लेखनिक यांच्या नावाने असल्याने चौकशी होणे कामी तक्रार दाखल झाली होती,
तर इतर प्रकरणात अलजदीद उर्दू हायस्कूलला शासकीय परवानगी गुलामअली नगर च्या पत्यावर असून ती शाळा भरत आहे सय्यदनगरच्या पत्यावर
आणि तसेच गुलामअली नगरच्याच पत्यावर शासकीय अनुदान घेण्यात आले आहे,
खरंतर गुलामअली नगरच्या पत्यावर अधिकारी यांनी डोळे बंद करून अनुदान दिल्याचे दिसून येत असल्याने याची देखील तक्रार दाखल झाली होती.
हेपण वाचा :हडपसर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या अलजदीद उर्दू हायस्कूलचा भोंगळ कारभार
तीस-या प्रकरणात सदरील शाळेच्या मुख्याध्यापकाने अल्पसंख्याक असलेल्या 9 वी तील मुलाला
किरकोळ कारणावरून ऐन वार्षीक परिक्षेच्या वेळेस शाळेंतून थेट बाहेरचा रस्ता दाखवून हातात शाळा सोडल्याचा दाखलाच देऊन अकलेचे तारेच तोडले होते.
याची हि तक्रार दाखल होऊन चौकशीची मागणी होत असल्याने याची गंभीर दखल घेत पुणे जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी
डाॅ गणपत मोरे यांनी सदर प्रकरणाची चौकशी होणे कामी उप शिक्षणाधिकारी सुधाकर पाखरे यांची नेमणूक केली आहे .
पाखरे यांनी सदरील संस्थेच्या शाळेस भेट देऊन तपासणी करून तपासणीचा स्वयंसपष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश पारित केले आहे.
आता हे अहवाल किती दिवसात सादर केले जाणार आणि पारदर्शक पणे अहवाल सादर होणार का?
व प्रत्येक तक्रारीची बारकाईने तपासणी करून तक्रारदाराला न्याय मिळवून दिला जाणार का?
यावर सजग नागरिक टाईम्स चे व त्या परिसरातील नागरिकांचे लक्ष टिकून राहणार आहे.