1 january :पुणे जिल्ह्यातील दुचाकी वाहनांची संख्या सुमारे 44 लाख 65 हजार 933 दुचाकी वाहने,
Helmet कंपन्यांचे येणार मात्र अच्छे दिन, लोकहित मोटरसायकल संघटनेचा विरोध
सनाटा प्रतिनिधी : 1 january NEWS :- नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकर लागले असुन नव्या वर्षातच Helmet सक्ती केली जाणार असल्याने पुणेकर सध्या नाराज झाले आहेत.
शहरातील वाहतुकीस शिस्त लागावी यासाठी पुणे शहर वाहतुक पोलीसांकडून दंडातमक कारवाईची मोहिम सुरू असून 1 जानेवारी पासून हेल्मेट सक्ती पुर्ण पणे राबवली जाणार असल्याने पुणेकरांची उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहे .
शहरातील वाहतुक कोलमडली असताना ती वाहतुक नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे सोडून Helmet सक्ती केल्याने वाहतुक कोंडी सुरळीत होणार का?
ज्या ज्या वेळी पोलीस आयुक्त बद्दलले त्या त्या वेळी Helmet सक्ती पुणेकरांवर लादली गेली पुणे करांचा विरोध पाहता ती सक्ती मावळली हि
परंतु नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम यांनी हि Helmet सक्तीचा बिगुल वाजविलयाने नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली आहे .
दर वेळीस आयुक्त बदलल्याने हेल्मेट सक्तीचाच पर्याय का निवडला जातो दुसरे पर्याय उपलब्ध नाहित का?
किंवा Helmet कंपन्यांचे लागेबांधे तर नाही ना असा प्रश्न पुणेकरांच्या मनात खदखदतोय ?
सक्ती करण्याअगोदर रस्त्यावरील खड्डे बुजवावे ,न दिसणारे Speed Breker काढावे, आयआरसी प्रमाणे असलेले Speed Breker घालावे,
दिवसेंदिवस फुटपाथाचे रूंदी करण वाढत आहे ते कमी करा हाॅटेल चालकांनी व मंगल कार्यालयांनी फुटपाथ हडप केले आहे ,
जड वाहनांना बंदी असताना हि राजरोसपणे प्रवेश चालू आहे यांच्यावर कारवाई व्हावी,अशी प्रतिक्रिया पुण्यात उमटत आहे.
विषेश म्हणजे पुणे शहरातील वाहतुक कोलमडली असताना हि आज वाहतुक पोलिस वाहतुक सुरळीत करण्याऐवजी दंड वसूल करण्यात मग्न झाले आहे.
त्यामुळे परिस्थिती सुधरायला तयार नाही.हेल्मेट घालून हि ज्यांचे अपघाती मृत्यू झाले आहे अश्या किती लोकांना वाहतुक पोलीसांनी भरपाई दिली आहे याचे हि जाहिर करावे?
हेल्मेट सक्ती करायची असेल तर वाहतुक कोंडी सोडवून वाहनांची झालेली कमी गती ती वाढवावी,
आज शहरात वाहनांची गती 10/20 प्रति ताशी असताना हेल्मेटची सक्ती का?
आज पुणे जिल्ह्यातील दुचाकी वाहनांची संख्या सुमारे 44 लाख 65 हजार 933 ऐवढी असुन एका दुचाकी चालकाला कमीतकमी 500 रुपयाला हेल्मेट पडले
तरी कोट्यवधी रुपयांचे हेल्मेट कंपन्यांचे टनओवर होणार असल्याने हेल्मेट कंपन्यांचे मात्र अच्छे दिन नक्कीच येणार?
कोणाच्या हितासाठी हि हेल्मेट सक्ती केली जात आहे हे दिसून येत आहेत? 1जानेवारी पासून होणाऱ्या हेल्मेट सक्तीला पुणेकर कश्या प्रकारे प्रतिसाद देतात
आणि संघटना कसे विरोध करतात यावर आता नजरे टिकून राहणार आहेत,
आज शहरात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे, रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा भरगच्च भरून शालेय विद्यार्थी यांना कोंबून नेले जात आहे,
हे मात्र कोणालाही दिसत नाही, तर वाहतुक पोलिस दंडात्मक कारवाई करण्यात मग्न असल्याने वाहतुक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे .
पुण्यातील प्रति ताशी वाहनांची गती कमी असताना हि हेल्मेट सक्ती का? असा प्रश्न सतावत आहे. पुण्यातील वाहतुक सुरळीत करावी
ती सुरळीत झाल्यास व वाहनांची गती वाढल्यास आम्ही पुणेकरांना सांगायची आवश्यकता भासणार नाही
आम्ही त्या वेळेस स्वता अमलबजावणी करू मग तो बाहुबलीचा Helmet असला तरी चालेल,, अजहर अहमद खान :लोकहित मोटरसायकल संघटना.