Makar Sankranti या सणाचा थेट संबंध आपला ग्रह पृथ्वीच्या भूगोल आणि सूर्याच्या स्थितीशी आहे. या दिवशी सूर्य उत्तरायण होऊन मकरमध्ये येतो. यामुळे मकर संक्रांतीचा सण या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि यासोबतच उत्तरायण सुरु होते. हा शुभकाळ मानला जातो. मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाच्या घरी गेले होते, यामुळे हा दिवस सुख-समृद्धीचा दिवसही मानला जातो. या दिवसापासून वसंत ऋतू सुरु होतो. यामुळे मकरसंक्रांतीला सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
मकरसंक्रांतीच्या विडिओ शुभेच्छा देण्यासाठी क्लिक करा
मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी क्लिक करा
देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेळे नाव आणि प्रथेनुसार हा सण साजरा केला जातो. भारतामध्ये सांस्कृतिक विविधतांमध्ये मकरसंक्रांतीचेसुद्धा एक विशेष महत्त्व आहे. देशातील अनेक भागांमध्ये हा सण साजरा केला जातो परंतु प्रत्येक राज्यात या सणाचे नाव आणि प्रथा वेगवेगळ्या आहेत. उदा. देशातील दक्षिणेकडील राज्य केरळ, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमध्ये या सणाला फक्त संक्रांती म्हटले जाते. तामिळनाडूमध्ये या सणाला पोंगल म्हटले जाते आणि येथे चार दिवस हा सण साजरा केला जातो. पंजाब आणि हरियाणामध्ये या सणाला लोहडी म्हटले जाते. आसाममध्ये बिहू आणि उत्तर भारतात मकरसंक्रांती म्हटले जाते.
मान्यतेनुसार महाभारतामध्ये भीष्म पितामह यांनी मकरसंक्रांतीच्या दिवशीचा प्राण त्याग केला होता. धर्म ग्रंथानुसार सूर्य एक वर्षात (365 दिवस) क्रमानुसार 12 राशीत भ्रमण करतो. जेव्हा सूर्य एखाद्या राशीत प्रवेश करतो, त्याला संक्रांती म्हणतात. सूर्याने धनु राशीतून मकर राशीत प्रवेश केल्यानंतर मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. सूर्य Makar राशीत जाणे खूपच शुभ मानले जाते.
कारण या दिवसापासून देवतांचा दिवस सुरु होतो, ज्याला उत्तरायण म्हणतात. महाभारतात अनेक ठिकाणी उत्तरायण शब्दाचा उल्लेख आढळून येतो. सूर्य उत्तरायणात असण्याचे महत्त्व याच कथेवरून स्पष होते की, बाणांच्या शय्येवर पडलेल्या पितामह भीष्म यांनी सूर्य दक्षिणायणातून उत्तरायणात जाईपर्यंत प्राण त्याग केला नाही. सूर्य उत्तरायणात गेल्यानंतर त्यांनी प्राण सोडला.स्वतः भगवान श्रीकृष्णाने उत्तरायणाचे महत्त्व गीतेमध्ये सांगितले आहे की, उत्तरायणाचा सहा महिन्यातील शुभ काळात जेव्हा पृथ्वी प्रकाशमय असते तेव्हा शरीराचा परित्याग केल्यास व्यक्तीचा पुनर्जन्म होत नाही. असे लोक ब्रह्मलोकात जातात. याउलट सूर्य दक्षिणायणात असल्यास पृथ्वी अंधकारात असते आणि या अंधकारात शरीराचा त्याग केल्यास पुनर्जन्म घ्यावा लागतो.
मकरसंक्रांतीला तिळाचे उटणे लावून स्नान केले करण्याची धार्मिक मान्यता आहे. पवित्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी लोक जमा होतात आणि यात्राही भारावली जाते. खिचडी बनवली जाते आणि तूप, गुळासोबत सहकुटुंब खाल्ली जाते. तीळ-गुळाचे लाडू या काळात खाल्ले जातात. तीळ, गूळ, खिचडी, छत्री आणि वस्त्र दानाचे विशेष महत्त्व या सणामध्ये आहे. महिला सौभाग्याशी संबंधित वस्तू दान करतात. स्नान आणि दान करण्यामागचे कारण म्हणजे यामुळेसूर्यनारायण प्रसन्न होतात आणि जीवन यशस्वी तसेच समृद्ध करतात. स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते. त्यानंतर दान केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार
Makar Sankrantiला सूर्यदेव शनिदेवाच्या घरी गेले होते यामुळे हा दिवस सुख आणि समृदीचा दिवस मानला जातो. मकरसंक्रांतीनंतर थंडी म्हणजेच हिवाळा ऋतू समाप्त होऊ लागतो आणि उन्हाचा प्रभाव वाढू लागतो. सूर्य उत्तरायण झाल्यामुळे असे घडते. दिवस मोठा आणि रात्र छोटी होऊ लागते. एकूणच वसंत ऋतूचे आगमन होते आणि वातावरण बदलते.