(Chhagan Bhujbal) सन २०१८ मध्ये शहरी भागात नवीन दुकाने वितरणाच्या जाहीरनाम्यास स्थगिती देण्यात आली होती .
(Chhagan Bhujbal) सजग नागरिक टाइम्स :
मुंबई : कोरोना आजारामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच अतिवृष्टी लक्षात घेता शहरी भागातही नवीन स्वस्त रास्त भाव धान्य दुकाने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली .
राज्य शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरिता रास्त भाव दुकानांची पुनर्रचना करण्याची कार्यवाही यापूर्वी करण्यात आली होती .
मात्र या कार्यवाहीला लागणारा कालावधी लक्षात घेता सन २०१८ मध्ये शहरी भागात नवीन दुकाने वितरणाच्या जाहीरनाम्यास स्थगिती देण्यात आली होती .
ही स्थगिती आता उठविण्यात आली आहे . त्यामुळे शहरी भागातही आता स्वस्त भाव धान्य दुकाने सुरू होणार आहेत .
वाचा : कोंढवा लुल्लानगर चौकात साचलेल्या पावसाच्या पाण्याला वाट मोकळी करुन देताना वाहतुक पोलिस
सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाने महाराष्ट्रात गरीब व गरजू लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .
शहरी भागात अशी लोकसंख्या अधिक आहे . तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही .
त्यामुळे या कालावधीत रास्त भाव दुकानांमार्फत राज्यातील गोरगरीब जनतेला अन्नधान्य तसेच केरोसिन वाटप चालू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे .
तसेच जुलै व ऑगस्ट मध्ये मुसळधार पावसामुळे अनेक शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे .
शहरी भागातील अनेक ठिकाणी नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे .
अशा परिस्थितीत तेथे सरकारी मदत अन्नधान्याच्या स्वरूपात रास्त भाव दुकानदारांच्य माध्यमातून देणे अनिवार्य असून मूळ परिस्थिती पूर्वपदावर आणणे ह शासनाची जबाबदारी ठरते , अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे .
वाचा : एएसके फंक्शन हॉलची १ कोटी २ लाख रूपयांची आजही थकबाकी.