(insurance company) विम्याच्या मुदतीत 140 दिवसांची मुदतवाढ
(insurance company) पुण्यातील एका रिक्षा व्यावसायिकाला कोरूना टाळेबंदी च्या अनुषंगाने टाटा एआयजी कंपनीने
विम्याच्या मुदतीत 140 दिवसांची मुदतवाढ मान्य केली त्यामुळे सर्वच कंपन्यांना ही मुदतवाढ देणे भाग पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
तसे झाल्यास राज्यातील किमान दहा लाख रिक्षा व्यावसायिकांचा प्रत्येकी दोन हजार आठशे रुपयांचा फायदा होणार आहे .
आम आदमी रिक्षा संघटनेने हा लढा भारतीय विमा नियमन प्राधिकरणाच्या हैदराबाद कार्यालयाकडे नेला व यात यश मिळविले,
विमा कंपन्या रिक्षाचालकांना ही मुदतवाढ द्यायला तयार नव्हते चार महिने बंद असल्याने अपघात होण्याचा प्रश्नच येत नाही
व त्यामुळे विम्याची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी रीक्षा पंचायत व अन्य रिक्षा संघटनांनी केली होती .
प्राधिकरणाने विमा संबंधित कायद्यात अशी तरतूद असल्याचे आम आदमी रीक्षा संघटनेला कळवले
त्याआधारे किरण कांबळे रीक्षा व्यावसायिकाने आप च्या सह्याने टाटाआयजी कडे अर्ज केला .
सोबत जिल्हाधिकाऱ्यांचे टाळेबंदी च्या आदेशाचे पत्र जोडले ,
कंपनीकडून आरटीओच्या पत्राची मागणी झाली मात्र तशी तरतूद नसल्याचे संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी विमा कंपनीला सांगितले .
वाचा : दोन समाजात तेढनिर्माण होईल असे वक्तव्य केल्या प्रकरणी मिलिंद एकबोटेवर गुन्हा दाखल.
ते मान्य करून कांबळे यांना 140 दिवसांची मुदतवाढ मान्य करण्यात आली
आता त्यांना नव्या वर्षाचा विमा या एकशे चाळीस दिवसांनंतर काढावा लागेल त्यात त्यांचा 2800 रुपयांचा फायदा झाला आहे .
आचार्य यांनी सांगितले की विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून विमा काढला जातो प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना ते बंधनकारक आहे .
त्यासाठी त्यांना वर्षाला 8500 रुपये मोजावे लागतात आता त्यांची किमान 140 दिवसांचे पैसे वाचणार आहे ,
या निर्णयाचा राज्यातील दहा लाख रिक्षा व्यावसायिकांना लाभ होणार आहे.